दुबई: आयसीसी टी 20 वर्ल्ड कपचे सामने सुरू आहेत. भारत पाकिस्तान आणि न्यूझीलंड विरुद्ध दोन सामने जिंकला आहे. ही स्पर्धा अत्यंत रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. 29 ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध बांग्लादेश सामना झाला. या सामन्यानंतर एक सर्वात मोठी गोष्ट घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमधून काही खेळाडू काही कारणांनी बाहेर पडताना दिसत आहेत. बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर देखील यंदाच्या  सामन्यात काही कारणांमुळे दिसले नाहीत. त्या पाठोपाठ न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन देखील जखमी झाल्याने बाहेर पडला आहे. 


असगर अफगाणने टी 20 वर्ल्ड कपमधून संन्यास घेतला. या सगळ्या घटनांपाठोपाठ आता बांग्लादेश संघाला एक मोठा धक्का बसला आहे. T 20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शाकिब अल हसनला दुखापत झाली आहे. 2006‑2021 त्याने 94  सामने खेळून 93 विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. 


विंडीज विरुद्धच्या सामन्यात शाकिबला दुखापत झाली आहे. त्याने 6 सामने खेळून 131 धावा केल्या आहेत. 11 विकेट्स घेण्यात यश मिळालं आहे. सामन्या दरम्यान शाकिबच्या स्नायूमध्ये दुखापत झाल्याने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तो पुढचे सामने खेळू शकणार नाही. शाकिबला दुखापत झाल्याने बांग्लादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.