Shakib AL Hasan On Umpire: शाकिब अल हसन एक अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र मैदानातील वर्तणामुळे कायमच चर्चेत राहीला आहे. पंचांबरोबरचा वाद तर नित्याचाच झाला आहे असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी पंचांसोबत केलेल्या वादामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मात्र इतकं असूनही शाकिबनं यातून कोणताही धडा घेतलेला नाही. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) पुन्हा एकदा पंचांसोबत वाद घातल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बीपीएलचा चौथा सामना फॉर्च्युन बारिशन आणि सिलहट स्ट्राइकर्स यांच्यात ढाकाच्या शेर ए बांग्ला नॅशनल स्टेडियममध्ये रंगला होता. यावेळी पंचांचा एका निर्णयाने शाकिबचा पारा चढला आणि त्याने पंचांच्या दिशेने कुच केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यातील 16 व्या षटकात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू फलंदाजी करत होता. शाकिब 22 चेंडूत 39 धावा करत मैदानात खेळत होता. तेव्हा गोलंदाजाने बाउंसर चेंडू टाकला. डोक्यावरून गेलेला हा चेंडू पंचांनी वाइड दिला नाही. त्यामुळे शाकिबला राग अनावर झाला. आक्रमक पवित्रा दाखवत पंचांच्या दिशेने जात वाइड न देण्याचं कारण विचारू लागला. यावेळी विरोधी संघाचा यष्टीरक्षक मुश्फिकुर रहिमनं पुढे येत शांत करण्यासाठी प्रयत्न केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 



समालोकचकही या व्हायरल क्लिपमध्ये सांगत आहे की, हा चेंडू वाइड होता. मात्र पंचांनी तो वाइड दिला नाही. पण मैदानात पंचांशी असा वाद घालू शकत नाही. या घटनेचा राग आल्याने पुढच्या चेंडूवर मिड-विकेटवरून षटकार ठोकला. तसेच अर्धशतकही पूर्ण केलं. शाकिबने 32 चेंडूत 67 धावांची खेळी केली. यात 7 चौकार आणि 74 षटकारांचा समावेश आहे.


बातमी वाचा- IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!


यापूर्वीही शाकिबनं पंचांशी वाद घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. 2021 मध्ये एका सामन्यात पंचांनी फलंदाजाला बाद न दिल्याने त्याचा पारा चढला होता. तेव्हा यष्टींवर जोर लाथ मारली होती. तसेच पंचांना अर्वाच्च भाषेत बोलला होता.