कोलंबो : बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनने निदहास ट्रॉफी स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची प्रतिज्ञा केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरचे षटक सुरु असताना बांगलादेश आणि श्रीलंकेतील खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. शाकिब अंपायरशी वाद घालू लागला आणि त्याने आपल्या टीमला माघारी बोलावे. यावेळी काही काळासाठी सामना थांबवण्यात आला. 


दरम्यान प्रशिक्षक खालिद मेहमूद यांनी बॅट्समनना पुन्हा बॅटिंगसाठी पाठवले आणि पुढच्याच बॉलवर महमूदुल्लाहने फोर मारला आणि त्यानंतर दोन रन्स काढले. अखेरच्या दोन बॉलमध्ये बांगलादेशला सहा रन्स हवे होते. यावेळी पाचव्या बॉलवर महमूदुल्लाहने षटकार मारला आणि स्टेडियममध्ये शांतता पसरली. श्रीलंकेचे चाहते शांत झाले. 


सामना संपल्यानंतर शाकीब म्हणाला, मी बॅटसमनना माघारी बोलवत नव्हतो तर त्यांना खेळत राहण्यास सांगितले. तुम्ही हे दोन्ही प्रकारे घेऊ शकता. तुम्ही याला कसे बघता यावर अवलंबून आहे. अशा काही गोष्टी असतात ज्या झाल्या नाही पाहिजेत. मला शांत राहायला हवे होते. मी अति उत्साहात होतो. त्यामुळे असे घडले. पुढच्या वेळेस मी नक्कीच शांत राहण्याचा प्रयत्न करेन. मी सतर्क राहेन. 



शाकीब पुढे म्हणाला, मैदानावर जे झाले ते बाहेर नाही झाले पाहिजे. आम्ही चांगले मित्र आहोत. दोन्ही बोर्डाशी चांगले संबंध आहेत. आम्ही एकमेकांची मदत करतो. मला कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकायचा होता.