पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. बांगलादेशविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान संघावर कडाडून टीका होत आहे. दुसरीकडे क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये मतांतर आणि दुरावा असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता ड्रेसिंग रुममध्ये कर्णधार शान मसूद (Shan Masood) आणि जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) यांच्यात राडा झाल्याचं वृत्त समोर येत आहेत. दोघेही आपापासत भिडले असून सोशल मीडियावर नेटकरी नाराजी व्यक्त करत असून, टीका करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरच्या मैदानावर बांगलादेशविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात आहे. दुसरा कसोटी सामना अद्याप होणं बाकी आहे. बांगलादेशने त्यांच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करून 1-0 अशी आघाडी घेत इतिहास घडवला. हा विजय बांगलादेशचा पाकिस्तानवर कसोटी सामन्यातील पहिला विजय आहे.


बांगलादेशविरोधातील पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या (Pakistan Cricket Team) व्यवस्थापनाने संघात बदल केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी शाहीन आफ्रिदीला (Shaheen Afridi) संघातून वगळण्यात आलं आहे. यामुळे पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसलेला असतानाच संघाच्या ड्रेसिंग रुममधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 



सोशल मीडियावर शान मसूद आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वाद झाल्यासंबंधी वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातील एका दाव्यानुसार, मोहम्मद रिझवान भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता दोघांनी मिळून त्याला मारहाण केली. 



दरम्यान शाहीन आफ्रिदीला संघातून वगळण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचा दावा पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जॅसन यांनी सांगितलं आहे. "आम्ही त्याच्याशी संवाद साधला आहे. आम्ही या खेळासाठी सर्वोत्तम संयोजन पाहत असल्याची त्याला जाणीव आहे. मागील काही आठवडे त्याच्यासाठी पितृत्व आणि इतर गोष्टींमुळे उत्साहाचा आहे. या विश्रांतीमुळे त्याला त्याच्या कुटुंबासह वेळ घालवता येईल, " असं पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले.