Shane Warne Biopic Sex Scene Accident: ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नच्या (Shane Warne) आयुष्यावर आधारित बायोपिकच्या (Shane Warne Biopic) शुटींगदरम्यान एक विचित्र अपघात घडला आहे. या बायोपिकमधील एक सेक्स सीन (Sex Scene) शूट करताना वॉर्नची भूमिका साकारणाला प्रमुख कलाकार आणि त्याची सहअभिनेत्री गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी थेट हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं असल्याची माहिती एनएमईने दिली आहे.


सेक्स सीन शूट करताना अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 मार्च 2022 रोजी शेन वॉर्नचं आकस्मिक निधन झालं. शेन वॉर्न थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असताना संभाव्य कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. ऑस्ट्रेलियातील चॅनेल 9 वर शेन वॉर्नच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक बनवला जात आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता अ‍ॅलेक्स विल्यम प्रमुख भूमिका साकारत आहे. मॅरनी कॅनडी ही वॉर्नची पूर्वाश्रमीची पत्नी सायमन कॅलहनची भूमिका साकारत आहे. मॅरनीनेच या चित्रपटामधील एक सेक्स सीन शूट करत असताना घडलेल्या एका विचित्र प्रकारानंतर अचानक आमच्यावर रुग्णालयामध्ये दाखल होण्याची वेळ आली असं 'डेली टेलिग्राफ'ला सांगितलं.


नेमकं घडलं काय?


"आम्ही कॉरिडोअरमधून चालत असताना अचानक आम्ही बेडरुममध्ये शिरुन बेडवर पडणं अपेक्षित होतं. मात्र नियोजित सिक्वेन्सप्रमाणे सारं काही घडलं नाही आणि आम्ही बेडवर पडलोच नाही," असं कॅनडी म्हणाली. कॅनडीच्या मनगटाला दुखापत झाली तर शरीराचं सर्व वजन हातावर आल्याने अ‍ॅलेक्स विल्यमच्या हाताला दुखापत झाली आहे. "हा अपघात घडल्यानंतर काही वेळानंतर आम्ही रुग्णालयातील इमर्जन्सी रुममध्ये होतो. त्याच्या हाताला बॅण्डएड बांधलेलं तर माझ्या मनगटाला," असंही कॅनडीने म्हटलं.


या बायोपिकला आधीपासूनच विरोध


शेन वॉर्नच्या चाहत्यांकडून फार आधीचपासूनच या बायोपिकला विरोध केला जात आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूला 2 वर्षही झाली नाहीत त्यापूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चित्रपट बनवण्याची फार घाई होत असल्याची टीका अनेक चाहत्यांनी केली आहे. दरम्यान यापूर्वीच शेन वॉर्नच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंट्रीचं टायटल शेन असं होतं. 


शेकडोंची चौकशी अन् सीसीटीव्ही


शेन वॉर्नचं थायलंडमधील हॉटेलमध्ये आकस्मिक निधन झाल्यानंतर अगदी त्याची हत्या करण्यात आल्यापासूनच्या इतर शक्यताही पडताळून पाहण्यात आल्या. वॉर्नच्या रुममध्ये कोण आलं कोण गेलं याची माहितीही यावेळेस तपास करणाऱ्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवली होती. शेकडो लोकांची चौकशी पोलिसांनी केली होती. मात्र यामध्ये कोणतीही अनुचित गोष्ट पोलिसांना आढळून आली नाही. त्यामुळे वॉर्नचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. शेन वॉर्नच्या आकस्मिक निधनामुळे त्याच्या कुटुंबियांबरोबरच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता.