मुंबई : शुक्रवारी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. थायलंडमध्ये शेन वॉर्न फिरायला गेला असताना ही घटना घडली. दरम्यान प्राथमिक अहवालांनुसार, शेन वॉर्नचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाला आहे. मात्र ज्यावेळी शेन वॉर्नचा मृतदेह नेण्यात येत होता तेव्हा कोणालाही यावर विश्वास बसला नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचमुळे आता अशी माहिती मिळतेय की, यावर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जातायत. त्यामुळे यासंदर्भात पोलीस आता शेन वॉर्नच्या मित्रांशी बोलणार आहे.


वॉर्नच्या मॅनेजमेंटकडून स्टेटमेंट जाहीर 


शेन वॉर्न त्याच्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्ज़ॉय करण्यासाठी गेला होता. याचठिकाणी त्याचं निधन झालं. वॉनच्या मॅनेजमेंटने दिलेल्य़ा माहितीप्रमाणे, वॉन त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. खूप प्रयत्नांनंतरही त्याला वाचवण्यात यश आलं नाही. 


मॅनेजरने दिला सीपीआर


शेन वॉर्नला ज्यावेळी अॅम्ब्युलन्समधून नेण्यात आलं त्यावेळी त्याचा मॅनेजर एंड्रूने त्याला सीपीआरही दिला. मात्र शेन वॉर्नला वाचवता आलं नाही. 


यावर थायलंडच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आम्ही सेन वॉर्नच्या मृत्यूला संशयित नजरेने पाहत नाही. मात्र प्राथमिक माहितीसाठी त्यावेळी जे उपस्थित होते त्या मित्रांशी चर्चा केली जाणार आहे.