मुंबई : 'जिंकण्याचा आनंद डोक्यात जाऊन देऊ नका, पराजयावर निराश होऊ नका', असं कायम म्हणणारा शेन वॉर्न हा अद्वितीय फिरकी गोलंदाज वयाच्या 52 व्या वर्षी सर्वांचा निरोप घेऊन गेला. त्याचं जाणं अनेकांना धक्का देणारं ठरलं. पण, नियतीपुढे कोणाचं काहीच चालत नाही... हाच नियम इथं लागू झाल्याचं दिसून आलं. (Shane Warne death)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वॉर्नच्या आयुष्याच्या चेंडूनं यावेळी उसळी घेतली, पण त्याचा नेमक मात्र चुकीचा लागला अशीच प्रतिक्रिया त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या क्रिकेटरसिकांनी व्यक्त केली.


शेन वॉर्नची कामगिरी इतकी दमदार की समोरचा फलंदाज त्याच्या फिरकीच्या माऱ्याचा विचार करुनच गारद होत होता. ऑस्ट्रेलियाच्या संधातून सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. 


भारताशी त्याचं खास नातं. 2008 मधील आयपीएल दरम्यान वॉर्ननं राजस्थानच्या संघाताल जेतेपद मिळवून दिलं. त्यावेळी संघाच्या कर्णधारपदी राहत त्यानं अतिशय दैदिप्यमान कामगिरी निभावली होती. 


बारकावे टीपत धाडसी निर्णय घेत वॉर्न कायम पाहणाऱ्यांना चकित करत होता. अनेक खेळाडूंसाठी तो कर्णधार कमी आणि हक्काचा माणूस जास्त होता. 


त्याचे काही सिद्धांत हे फक्त खेळाडूच नव्हे तर इतरांनाही प्रेरणा देतील असे होते. 2 तास सराव करा, पण तोही असा करा की सात तासांचा सराव केल्याची जाणीव तुम्हाला असेल; असं तो कायम म्हणत राहिला. 


सामन्यात कामगिरीनं सर्वांना थक्क करायचं आहे तर ते पहिल्या तीन तासांमध्ये करा, अशी कमाल करा की हे तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्नाचे तीन तास आहेत... असंच तो कायम राजस्थानच्या खेळाडूंना सांगत राहिला. 


वॉर्ननं संघात ओतलेला जीव आणि त्याची खेळाप्रतीची आत्मियता पाहता त्याच्या या गुणांच्या बळावरच राजस्थानला जेतेपद मिळालं यात वाद नाही. 


शेन वॉर्न आज या जगातून निघून गेला असला तरीही जागतिक स्तरावर खेळाडूंना आणि विशेष म्हणजे क्रिकेटपटूंना तो कायमच प्रेरणा देत राहील हे निश्चित.