Shane Warne वर तिचं जीवापाड प्रेम; आठवणीनं भावुक होत रोमँटिक फोटो शेअर करणारी `ती` आहे तरी कोण?
वॉर्नवर असंच प्रेम केलं ते म्हणजे...
मुंबई : जागतिक क्रिकेटमध्ये दैदिप्यमान कामगिरी करणारा आणि विरोधी संघातील फलंदाजांना घाम फोडणाऱ्या शेन वॉर्न यानं काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. ऑस्ट्रेलिया संघातील हा खेळाडू जगातील प्रत्येक क्रीडारसिकाच्या मनात घर करुन गेला.
वॉर्न फक्त खेळपट्टीवर नव्हे, तर मैदानाच्या बाहेरील जगतातही तितकाच लोकप्रिय आणि असामान्य व्यक्ती म्हणूनच सर्वांसमोर येत होता. त्याच्याभोवती वादग्रस्त विषयही कमी नव्हते.
यातही या देखण्या वॉर्नही प्रेमप्रकरणं विषेश गाजली. वॉर्नवर असंच प्रेम केलं ते म्हणजे ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री Elizabeth Hurley हिनं.
एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या या जोडीनं 2013 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नातं बऱ्याच वर्षांपूर्वी संपलं असलं तरीही तिच्या मनात असणारं वॉर्नचं स्थान मात्र अबाधित राहिलं.
म्हणूनच की काय, त्याच्या निधनानंतर तिनं लिहेलेले शब्द सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणणारे ठरले.
56 वर्षीय Elizabeth Hurley नं इन्स्टाग्रामवर वॉर्नसोबतचे काही फोटो पोस्ट करत त्याला कॅप्शन देत लिहिलं, 'मला असं वाटतंय की, सूर्य त्या ढगांच्या आड गेला आहे. सिंहाचं काळीज असणाऱ्या माझ्या प्रियकरा... तुला चिरशांती लाभो...'
वॉर्न आणि तिचं नातं, आज संपुष्टात आलेलं असलं तरीही तिच्या मनात असणारं त्याचं स्थान आणि प्रेम मात्र कमी झालं नसल्याचंच ही पोस्ट सांगून गेली.