शेन वॉर्न म्हणाला, `...त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतोय`
राजस्थानच्या टीमला टीकेचा सामना करावा लागतोय.
नवी दिल्ली : 'आयपीएल ११' मध्ये पुन्हा एकदा चेन्नई टीमचा पगडा भारी दिसतोय. पण दुसरीकडे चांगली सुरूवात करुनही राज्यस्थानच्या टीमला विजयासाठी वाट पाहावी लागतेय. त्यांना लागोपाठ दोन सामन्यात हार पत्करावी लागली. त्यामूळे टीमसोबतच त्याचे फॅन्सही नाराज आहेत. त्यानंतर टीम मेंटर शेन वॉर्नने टीमच्या फॅन्सची माफी मागितली आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानच्या टीमला ६४ रन्सने हरविले. चेन्नईचा सलामी फलंदाज शेन वॉटसनने मिळालेल्या दोन जिवदानाचा फायदा उठवून टी २० करियरमधील आपल चौथ शतक लगावल. त्या जोरावर चेन्नईने राजस्थानला ६४ रन्सने हरविले. त्यानंतर चेन्नईची टीम टॉप वनला पोहोचली. पण राजस्थानच्या टीमला टीकेचा सामना करावा लागतोय.
चाहत्यांची माफी
त्यामूळे टीमचा मेंटर शेन वॉर्नने चाहत्यांची माफी मागितली. 'ज्या पद्धतीने चेन्नईविरुद्ध राजस्थानच्या टीमने तीनही डिपार्टमेंटमध्ये खराब कामगिरी केली, त्याबद्दल मी माफी मागतो. पण आमचे खेळाडू आता चांगल प्रदर्शन करतील. त्यामूळे निराश होऊ नका. धैर्य कायम ठेवा. आम्ही पुनरागमन नक्की करु. पुढच्या २ मॅचमध्ये आम्ही जिंकू.' ५ मॅच खेळून २ मॅच जिंकण या स्टेजला ठिक नसल्याचेही त्याने सांगितले.