मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात मोठा राडा पाहायला मिळाला. ऋषभ पंतने अंपायरचा निर्णय पंतला न पटल्याने खेळाडूंना मैदान सोडण्यासाठी सांगितलं. त्यावरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला. यामध्ये अखेर असिस्टंट कोच शेन वॉटसन यांना पडावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यांसमोर शेन वॉट्सन यांनी ऋषभ पंतला झापलं. शेन वॉटसन पंतला ओरडताना दिसले. त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्ती केली. वॉटसन ओरडत असताना पंत मान खाली घालून ऐकत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.


नेमकं काय घडलं?
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने एक नो बॉल दिला नाही. अंपायरने DRS देखील घेतला नाही. त्यामुळे पंत चिडला. अंपायरचा निर्णय त्याला मान्य नव्हता. त्याने खेळाडूंना मॅच सोडून बाहेर येण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. 


या सगळ्यात असिस्टंट कोच शेन वॉटसन यांना मध्यस्ती करावी लागली. त्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला. एवढा सगळा खटाटोप करूनही पंतच्या हातून सामना गेला. 


शेवटच्या ओव्हरमध्ये पंतला 36 धावांची गरज होती. मात्र 15 धावा कमी पडल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. राजस्थान टीमने 5 गडी गमावून 217 धावा केल्या. 218 धावांचं लक्ष्य दिल्ली टीमला गाठता आलं नाही.