विमानतळावर या भारतीय खेळाडूची बॅग गायब, भज्जीने मागितली माफी, नक्की काय घडलं?
विमानतळावर या खेळाडूची बॅग गायब झाल्यावर भज्जीने का मागितली माफी...जाणून घ्या
Harbhajan Singh Viral Tweet : भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvsSa ODI Series) यांच्यात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूला मुंबई विमानतळावर त्रासाचा सामना करावा लागला. दिल्लीहून मुंबईला परतत असताना मुंबई विमानतळाच्या टर्मिनल-2 वरून या खेळाडूची किट बॅग गायब झाली होती. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून युवा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर खेळाडू आहे. (shardul thakur complains missing luggage harbhajan singh responds team india latest marathi news)
यामुळे शार्दुल चांगलाच भडकला, त्याने ट्विट करत मदत मागितली होती. त्यानंतर माजी खेळाडू हरभजन सिंहने त्याच्या ट्विटला रिप्लाय देताना माफी मागितली. मात्र हरभजनने माफी का मागितली अनेकांना समजलं नाही. शार्दुलने ट्विट करत, एअर इंडिया मला लगेज बेल्टवर कोणाला माझ्या मदतीसाठी पाठवू शकतं का? कारण ही पहिली वेळ नाही. मला माझी बॅग वेळेवर न मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. तुमचा एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचं म्हटलं होतं.
शार्दुलच्या ट्विटला हरभजन सिंहने रिप्लाय देत, तू काळजी करू नकोस. तुला तुझी बॅग मिळेल. आमचे कर्मचारी तिथे पोहोचतील, झालेल्या त्रासाबद्दल क्षमस्व. (माजी एअरइंडियन भज्जी) असं म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा शार्दुलने ट्विट करत, भज्जी पा लव्ह यू, मला दुसऱ्या विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. मला माझी बॅग मिळाली, धन्यवाद, असं म्हटलं आहे. हरभजन एअर इंडियाचा कर्मचारी राहिला आहे आणि या एअरलाइन कंपनीसाठी क्रिकेटही खेळला आहे.
दरम्यान, दीपक चहर दुखापतग्रस्त झाला असून त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला ऑस्ट्रेलियामध्ये पाठवलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या खेळाडूला संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.