हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिजमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये फास्ट बॉलर शार्दुल ठाकूरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे शार्दुल ठाकूरला पुढे एकही बॉल टाकता आला नाही. दुखापतग्रस्त असतानाही शार्दुल ठाकूर बॅटिंगला आला. शार्दुल ठाकूर मांडीच्या दुखापतीनं त्रस्त होता. तरी त्यानं हिंमत दाखवली आणि लंगडतच तो बॅटिंगला आला. शार्दुल ठाकूरनं रवीचंद्रन अश्विनसोबत २८ रनची पार्टनरशीप केली. यामुळे भारताची आघाडी ५६ रनची झाली आणि या मॅचवर भारताची पकड आणखी मजबूत झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शार्दुल ठाकूर बॅटिंगला आला तेव्हा उमेश यादव आऊट झाला होता. त्यावेळी भारताचा स्कोअर ३३९ रन होता. मांडीला दुखापत झालेली असतानाही शार्दुल अश्विनबरोबर दोन रनही धावला. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या शार्दुल ठाकूरला या मॅचमध्ये फक्त १० बॉलच टाकता आले. पहिल्या दिवशी दुखापत झाल्यानंतर शार्दुल दुसऱ्या दिवशीही बॉलिंग टाकायला आला नाही.


शार्दुल ठाकूरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह


शार्दुल ठाकूरला दुखापत झाल्यामुळे आता त्याचा निवडीवर आणि एनसीएच्या रिहॅबिलिटेशनवर प्रश्न उपस्थित होत आहेत. दुबईमध्ये आशिया कप खेळताना ठाकूरच्या मांडीलाच दुखापत झाली होती. त्यामुळे शार्दुल ठाकूरला परत भारतात पाठवण्यात आलं. १० दिवसानंतर २८ सप्टेंबरला शार्दुल ठाकूरला विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळवण्यात आलं. यानंतर त्याची वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली.


दुसऱ्या टेस्टमध्ये मोहम्मद शमीऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली. पण चौथ्या ओव्हरच्या चौथ्या बॉललाच शार्दुल ठाकूरच्या मांडीला पुन्हा दुखापत झाली. एकच दुखापत वारंवार होत असेल तर मग शार्दुल ठाकूरला एवढ्या कमी दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा खेळण्याची परवानगी कशी देण्यात आली, हा प्रश्न आहे.