नवी दिल्ली : टीम इंडियाच्या परदेश दौ-यासाठी बॅटिंग कोच म्हणून निवड झालेल्या राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच झहीर खानच्या निवडीला प्रशासकीय समितीनं रेड सिग्नल दाखवलाय. त्यांच्या निवडीबाबत आता 22 जुलैला अंतिम निर्णय घेण्यात येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सल्लागार समितीनं द्रविड आणि झहीरचं नाव सुचवलं होतं. मात्र, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र यांच्याशी चर्चा करुनच निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रशासकीय समितीनं म्हटलंय. 


बीसीसीआय अध्यक्ष सीके खन्ना, अमिताभ चौधरी, डायना इडुलजी आणि राहुल जोहरी यांची 19 जुलैला बैठक होईल. दरम्यान, राहुलप्रमाणेच झहीरची निवडही परदेश दौ-यासाठीच करण्याच आल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट केलं गेलं. 


मात्र, आता शास्त्रींनी आफला आवडता सपोर्टींग स्टाफ निवडण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. शास्त्रींचा बॉलिंग कोचसाठी भारत अरुण यांच्यासाठी आग्रह आहे. त्यामुळेच हा सगळा खटाटोप सुरु असल्याची चर्चा आहे.