हार्दिकला भेटण्यासाठी तब्बल तीन तास ती वाट पाहत होती...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामने संपलेत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलमध्ये भारताचा १५ जूनला बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. बर्मिंगहमला हा सामना रंगणार आहे.
बर्मिंगहम : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील साखळी सामने संपलेत. आता फायनलमध्ये प्रवेशासाठी चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने रंगणार आहेत. सेमीफायनलमध्ये भारताचा १५ जूनला बांगलादेशविरुद्ध सामना रंगणार आहे. बर्मिंगहमला हा सामना रंगणार आहे.
दरम्यान, भारतीय संघातील ऑलराऊंडर क्रिकेटर हार्दिक पंड्यासाठी एक तरुणी चक्क बर्मिंगहमला येऊन पोहोचलीये. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ वास्तव्याला आहे तेथे सिमोना नावाची तरुणी तिच्या मैत्रीणीसह तब्बल तीन तिचा हिरो हार्दिक पंड्याची वाट पाहत होती.
इतकंच नव्हे तर तिने हार्दिकसाठी गिफ्टही आणले होते. सिमोनासह तिची मैत्रीण साराहही आहे. पंड्यासाठी आणलेल्या कार्डवर तिने आय लव्ह यू हार्दिक तसेच चॉकलेट बॉक्सवर तुझ्यापेक्षा ही चॉकलेट्स नक्कीच गोड नसतील असं म्हटलंय