IND vs NZ : टॉस हरल्यानंतर Shikhar Dhawan ने केलं असं की... 2 मिनिटं विलियम्सनही झाला कंफ्यूज, Video व्हायरल
टॉस हरल्यानंतर शिखर धवनने केल्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) देखील 2 मिनिटं कंफ्यूज असल्याचं दिसून आलं.
IND vs NZ 1st ODI : आज न्यूझीलंड विरूद्ध भारत (IND vs NZ) यांच्या पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात 307 रन्सचं लक्ष्य सहजतेने पूर्ण केलं. पहिल्याच वनडे सामन्यात भारताचा पराभव झाल्याने न्यूझीलंडने 1-0 अशी सिरीजमध्ये आघाडी घेतलीये. भारताचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आज टॉसही जिंकू शकला नाही. दरम्यान टॉस हरल्यानंतर शिखर धवनने केल्या कृत्यामुळे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) देखील 2 मिनिटं कंफ्यूज असल्याचं दिसून आलं.
ऑकलंडच्या ईडन पार्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात टॉसवेळी दोन्ही कर्णधार उभे होते. टॉससाठी नाणं उडवण्यात आलं आणि केन विलियम्सन टॉस जिंकला. याचवेळी शिखर धवनने असं काही केलं आणि केन कंफ्यूज होत हसू रोखू शकला नाही.
नेमकं काय घडलं?
टॉस न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन जिंकला होता. मात्र त्यानंतचा निर्णय सांगण्यासाठी पटकन शिखर धवन पुढे सरसावला. शिखरच्या या वागण्याने केन देखील पेचात पडला आणि त्यानंतर हसू लागला. यावेळी केनच्या मनातंही टॉसचा निर्णय नेमक्या कोणच्या बाजूने लागलाय हा प्रश्न निर्माण झाला होता. केनची परिस्थिती पाहून शिखर धवनने स्वतःच केन टॉस जिंकल्याचं सांगितलं. दरम्यान शिखर धवनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा विजय
पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने (IND vs NZ) टीम इंडियाचा पराभव केलाय. न्यूझीलंडच्या टॉम लेथम (Tom Latham) आणि कर्णधर केन विलियम्सनच्या (Kane Williamson) झुंजार खेळीपुढे भारताचा पराभव झालाय. 7 विकेट्सच्या जोरावर न्यूझीलंडने वनडे सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. न्यूझीलंडकडून टॉम लेथम या सामन्याचा खरा शिल्पकार ठरला आहे.
या सामन्यात न्यूझीलंडचा कर्धणार केन विलियम्सनने टॉस जिंकला. यावेळी टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 307 रन्सचं लक्ष्य टीमसमोर ठेवलं. यावेळी न्यूझीलंडची फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर टॉम लेथम आणि केन विलियम्सनच्या तुफान खेळीने भारताच्या वाटेचा विजय न्यूझीलंडने हिसकावला. यावेळी टॉमने नाबाद 145 तर केनने नाबाद 94 रन्सची खेळी केली.