ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे. पण त्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेतून शिखर धवननं माघार घेतली आहे. बायकोची तब्येत बरी नसल्यामुळे धवननं पहिल्या तीन वनडेमधून माघार घेण्याबाबत बीसीसीआयला विनंती केली होती. धवनची ही विनंती बीसीसीआयनं स्वीकारली आहे.
धवनच्याऐवजी कोणत्याच खेळाडूला टीममध्ये स्थान न देण्याचा निर्णय निवड समितीनं घेतला आहे. निवड समितीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वनडेसाठी टीमची घोषणा केली आहे. पाच वनडेनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी-२० खेळणार आहे.
पहिल्या तीन वनडेसाठी भारतीय टीम
विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया सीरिजचं वेळापत्रक
१७ सप्टेंबर- पहिली वनडे- चेन्नई, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२१ सप्टेंबर- दुसरी वनडे- कोलकता, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२४ सप्टेंबर- तिसरी वनडे- इंदूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
२८ सप्टेंबर- चौथी वनडे- बंगळुरू, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
१ ऑक्टोबर- पाचवी वनडे- नागपूर, डे-नाईट, दुपारी १.३० वाजता
टी-२०
७ ऑक्टोबर- पहिली टी-20- रांची, डे-नाईट, सायंकाळी ७ वाजता
१० ऑक्टोबर- दुसरी टी-20- गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजता
१३ ऑक्टोबर- तिसरी टी-20- हैदराबाद , सायंकाळी ७ वाजता