मुंबई : आयपीएल 2021 जवळ येत आहे त्यामुळे सगळ्याच टीम जोरदार तयारी करत आहेत. सगळे खेळाडू सराव करण्यात व्यस्त असताना शिखर धवन मात्र काहीतरी वेगळेच करताना पाहायला मिळत आहे. शिखर धवनने आपल्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोबत डान्स करताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. त्याने लॉकडाऊन दरम्यान अनेक व्हीडिओ शेअर केले, जे चाहत्यांना खूप आवडले. नुकताच त्याने धनश्री बरोबर डान्स करतानाचा व्हीडिओ शेअर केला. चाहत्यांनी त्याला खूप पसंत केला आहे.


व्हीडिओमध्ये शिखर आणि धनश्री भांगडा करत आहेत. कॅप्शनमध्ये धवनने लिहिले आहे की, 'गब्बरच्या स्टाईलमध्ये भांगडा'. धनश्रीनेही तिच्या अकाउंटवरून हा व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे या व्हीडिओला तुफान लाईक्स मिळत आहेत.



काही दिवसांपूर्वी, गायक जस्सी गिलसह धनश्रीचे 'ओये होये होये' हे गाणे रिलीज झाले होते, जे यूट्यूबवर 21 लाखाहून अधिक views मिळाले आहेत.


धनश्री वर्मा  (Dhanashree Verma) व्यवसायाने डॉक्टर आहे. याशिवाय ती कोरिओग्राफर देखील आहे. लॉकडाऊन दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्रीची भेट झाली आणि तिथून या दोघांची प्रेम कहाणी सुरु झाली. नुक्तच युजवेंद्र चहल आणि धनश्रीचं लग्न झाले आहे.