Shikhar Dhawan NPL 2024: टीम इंडियाचा सुपरस्टार फलंदाज शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. टीम इंडियासाठी त्याचे योगदान मोठे होते. निवृत्तीनंतर तो यंदाच्या आयपीएलमध्येही खेळताना दिसणार नाहीय. आता शिखर धवनच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आली आहे. शिखर धवन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर धमाल करायला सज्ज झाला आहे. तो प्रथमच नेपाळ प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. तो एनपीएलमधील कर्नाली यॅक्सचा एक भाग आहे. त्याच्या फ्रँचायझीनेच ट्विट करून शिखर धवनबद्दलची माहिती दिली आहे.


धवनच्या टीमचा सामना 2 डिसेंबरला 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेपाळ प्रीमियर लीग 2024 चा पहिला हंगाम 30 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. शिखर धवनच्या संघ कर्नाली यॅक्सचा पहिला सामना जनकपूर बोल्ट्सविरुद्ध होणार आहे. 2 डिसेंबरला हा सामना खेळवला जाईल. ज्यामध्ये धवन खेळू शकतो. सोमपाल कामी हा शिखरच्या टीमचा कर्णधार आहे. 


कर्नाली यॅक्सने ट्विट करुन दिली माहिती 



शिखर धवनच्या एनपीएल खेळण्याबद्दलची माहिती त्याच्या फॅन्सना ट्वीटरच्या माध्यमातून मिळाली. कर्नाली यॅक्सने ट्विट करून लिहिले की,  'प्रतीक्षा संपली - शिखर धवन 'गब्बर' आला आहे. नेपाळ प्रीमियर लीगच्या एका अविस्मरणीय हंगामासाठी कर्नाली याक्समध्ये सामील झाल्यामुळे पॉवर-पॅक कामगिरीसाठी सज्ज व्हा. चला एकत्र ट्रॉफी घरी आणूया.'


दीड वर्ष टीम इंडियात मिळाली नव्हती संधी  


शिखर धवनने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना हा 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध खेळला होता. मात्र त्यानंतर शिखरला टीम इंडियात स्थान मिळाले नव्हते. शिखर धवनने टीम इंडियाकडून 167  वनडे, 68 टी20 आणि 34 टेस्ट सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने वनडेत 6782 धावा, टेस्ट क्रिकेटमध्ये 1759 तर टी 20  मध्ये 2315  धावा केल्या आहेत. शिखर धवनने टेस्ट क्रिकेट खेळताना 7 शतक झळकावली. तर वनडेमध्ये त्याने 17 शतक ठोकली तर टी 20 मध्ये 11 अर्धशतक ठोकण्यात धवनला यश आले होते. 


या स्पर्धेत एकूण 8 संघ होणार सहभागी 


नेपाळ प्रीमियर लीगच्या पहिल्या सेशनमध्ये एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये विराटनगर किंग्स, चितवाल राइनोज, जनकपूर बोल्ट, कर्नाली याक्स, काठमांडू गुरखा, लुंबिनी लायन्स, पोखरा ॲव्हेंजर्स, फार वेस्ट रॉयल्स यांचा समावेश आहे. स्पर्धेचा अंतिम सामना 21 डिसेंबर रोजी कीर्तिपूर येथे होणार आहे.