Sania Mirza husband Shoaib Malik: भारताची स्टार बॅटमिंटनपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) शुक्रवारी तिच्या कारकिर्दीमधील शेवटचा सामना खेळला. ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open) स्पर्धेमध्ये मिश्र दुहेरीमध्ये उपविजेता राहत तिने आपल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील करियरला पूर्णविराम दिला. सानियाने आपल्या करियरमध्ये एकूण सहा ग्रॅण्डस्लॅम पुरस्कार जिंकले. त्यापैकी तीन महिला दुहेरीचे आणि तीन मिश्र दुहेरीचे आहेत. ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या सानियाबद्दल पती शोएबने मलिकने ट्वीट (Shoaib Maliks Tweet On Sania Mirza) करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


अंतिम सामन्यात काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्यामध्ये सोनिया आणि बोपन्ना यांच्या जोडीने रॉड लेवर एरेनामधील अंतिम सामन्यामध्ये लुइसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राझेलियन जोडीला कडवी झुंद दिली. 6-7 (2) आणि 2-6 च्या फरकाने सानिया आणि बोपन्नाने हा सामना गमावला. सामना संपल्यानंतर सानिया भावूक झाली. सामन्यानंतरच्या निरोपाच्या भाषणामध्ये सानियाला अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.


शोएब काय म्हणाला?


सानिया आणि बोपन्नाचा पराभव आणि त्यानंतर सानियाने दिलेल्या निरोपाच्या भाषणानंतर शोएबने सानियाच्या फोटोसहीत एक ट्वीट केलं. पाकिस्तानचा धडाकेबाज फलंदाज अशी ओळख असलेल्या शोएब मलिकने पत्नीच्या शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम सामन्याच्या दिवशीच हे ट्वीट केलं. शोएबने सानियाला तिच्या उत्तम करियरसाठी शुभेच्छा दिल्या. "क्रीडा क्षेत्रात सर्व महिलांसाठी तू एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेस. तुझ्या करियरमध्ये तू जे काही मिळवलं आहे त्याबद्दल तुझा मला फार अभिमान वाटतो. तू अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेस. अशीच कणठखरपणे पुढे जात राहा. तुझ्या या अविश्वसनीय करियरसाठी तुला फार शुभेच्छा..."



घटस्फोटाच्या चर्चा


सानियासंदर्भात शोएबने केलेलं हे ट्वीट फार व्हायरल होत आहे. अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. हे दोघेही एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा पेज थ्री पासून सर्वच ठिकाणी चांगल्याच गाजल्या. मात्र दोघांनीही यासंदर्भातील कोणतीही घोषणा केलेली नाही. या बातम्या केवळ शक्यता आणि सोशल मीडियावरील चर्चेपुरत्याच राहिल्या.