मुंबई : जगात कोरोना  व्हायरसने थैमान घातला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने गेल्या पाच महिन्यांमध्ये शोएबने सानिया आणि आपल्या मुलाची भेट घेतलेली नाही. दरम्यान पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंना करोना झाल्यामुळे शोएब मलिकला भारतात एन्ट्री मिळणं कठीण असल्याचं दिसून येत आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक भारतात येवून पत्नी आणि मुलाची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सानिया आणि तिचा मुलगा हे दोघेही भारतामध्येच आहेत. त्यामुळे आधी पत्नी आणि मुलाची भेट घेतल्यानंतरच तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. २८ जूनला पाकिस्तानचा २९ खेळाडूंचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. शोएब मात्र दौऱ्याला जाण्यापूर्वी पत्नी सानियाला भेटणार आहे.  


परंतु पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंना कोरोना झाल्यामुळे हा दौरा अडचणीत येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जर पाकिस्तानचे तीन खेळाडू कोरोना बाधित असतील तर संघाला सामील करून घ्यायचे की नाही असा प्रश्न इंग्लंडला पडू शकतो. सद्य स्थितीला यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 


पाकिस्तानच्या संघात शोएबही होता. त्याला भारतामध्ये सानिया आणि मुलाला भेटायला यायचे आहे. परंतु त्याचे कोरोना रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत त्याचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येत नाहीत तोपर्यंत त्याला भारतात येता येणार नाही.