RCB Released Players : सर्वांना मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्सकडून मोठ्या निर्णयाची अपेक्षा होती. मात्र, रॉयल चॅलेजर्सं बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) दोन मोठे निर्णय घेतले असून त्यांनी सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 खेळाडूंना सोडचिठ्ठी दिली आहे, ज्यात वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga), हर्षल पटेल, जोश हेझलवूड (Josh Hazlewood), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पारनेल, सोनू यादव, अविनाश सिंग, सिद्धार्थ कौल, केदार जाधव यांची नावे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB Released Players) रामराम ठोकलेल्या 12 खेळाडूंमध्ये स्टार स्पिनर वानिंदू हसरंगा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज जोश हेझलवूड यांना समावेश आहे. त्यामुळे आता विराट कोहली अन् कॅप्टन फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) यांनी हा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जात आहे. यंदाच्या लिलावात वानिंदू हसरंगा पुन्हा आरसीबीच्या संघात दिसण्याची शक्यता आहे.



आरसीबीने कायम ठेवलेले खेळाडू


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), दिनेश कार्तिक, अनुज रावत, रजत पाटीदार, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, मयंक डागर, मनोज भंडागे, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कर्ण शर्मा, रेस हिमांशू शर्मा, राजन कुमार.


दरम्यान, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक सुरू होण्यापूर्वी हसरंगा वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. त्याला लंका प्रीमियर लीग 2023 हंगामाच्या अखेरीस दुखापती झाली होती. हसरंगा विश्वचषकात पुनरागमन करेल याची प्रत्येकाला अपेक्षा होती. मात्र, त्याला कमबॅक करता आलं नाही. वर्ल्ड कपनंतर तो आयपीएल खेळणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, आता त्याला डच्चू देण्यात आला आहे.


आणखी वाचा - IPL 2024 : रोहित शर्माचा मुंबई इंडियन्सचा म्होरक्या, 'या' खेळाडूंना टाटा गुड बाय!


दरम्यान, 22 नोव्हेंबर रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात ट्रेड झाला. यामध्ये राजस्थान रॉयल्सने त्यांचा फलंदाज देवदत्त पडिक्कल (७.७५ कोटी रुपये) आणि लखनऊ सुपर जायंट्सने त्यांचा गोलंदाज आवेश खान (१० कोटी) यांची अदलाबदल केली. तर या आधी 3 नोव्हेंबर रोजी रोमारियो शेफर्ड लखनऊमधून मुंबई इंडियन्समध्ये गेला. तो यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता.