`मला अजून बॅटिंग करायला हवी....` म्हणत कर्णधार श्रेयस अय्यरनं सांगितलं पराभवाचं कारण
श्रेयस अय्यरनं या खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर; सांगितलं पराभवामागचं कारण, पाहा काय म्हणाला....
मुंबई : आयपीएलमधील 150 वा कोलकाताचा सामना अत्यंत वाईट झाला. राजस्थाननं हा सामना आपल्या नावावर केला. कोलकाताला हा सामना अत्यंत वाईट पद्धतीनं गमवण्याची वेळ आली. 7 धावांनी हा सामना गमवावा लागला. या पराभवासाठी श्रेयस अय्यरने एका खेळाडूला जबाबदार धरलं आहे.
'युजवेंद्रने सामन्याची बाजी पलटली. आम्ही सुरुवातीला चांगल्या धावा बनवल्या. मला शेवटपर्यंत फलंदाजी करायची होती. मात्र चहलने सगळी गडबड केली.'
'आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आमची सुरुवात खूप चांगली होती. मात्र ती लय कायम ठेवणं टीमला जमलं नाही. त्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. चहलच्या गुगली बॉलसमोर कोलकाता फलंदाज गार पडले आणि आर्धी टीम तंबुत परतली.'
'कोलकाता विरुद्धच्या सामन्यात युजवेंद्रने 4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स घेतल्या. जोस बटलरने सुरुवात हळू केली असली तर त्याने खूप जास्त धावा केल्या. ह्या मैदानावर आम्हाला यश मिळवता आलं नाही. आम्ही नक्की पुन्हा सकारात्मकपणे आणि नव्या उमेदीनं पुन्हा फॉर्ममध्ये खेळू', असा विश्वास श्रेयसने व्यक्त केला.