IPL 2022 : KKR कडून कर्णधाराची घोषणा, हा युवा खेळाडू करणार नेतृत्व
KKR संघाने IPL 2022 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. kkr ने या युवा खेळाडूवर विश्वास दाखवला आहे.
मुंबई : आयपीएलचा मेगा लिलाव संपल्यानंतर आता सर्व संघांपुढे टीमची बांधणी करण्याचं काम आहे. आता आयपीएल 2022 साठी केकेआरने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दिल्ली कॅपिटल्सला फायनलपर्यंत पोहोचवणाऱ्या खेळाडूला नेतृत्व करण्याची संधी दिली गेली आहे. आपल्या तुफानी खेळासाठी देखील तो प्रसिद्ध झाला आहे.
केकेआरने श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा दिली आहे. श्रेयस अय्यर एक चांगला कर्णधार म्हणून यशस्वी झाला आहे. याआधी दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व त्याने केले आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने चांगली कामगिरी करुन फायनलपर्यंत मजल मारली होती.
श्रेयस अय्यर वेळेनुसार गोलंदाजीत बदल करण्याच्या बाबतीत योग्य निर्णय घेण्यात यशस्वी ठरला आहे. तो गोलंदाजांना सतत प्रोत्साहन देत असतो. उत्साह वाढवतो. जेणे करुन त्यांच्यावर प्रेशर येत नाही. त्याच्याकडे आता अनुभव आहे. ज्याच्या जोरावर तो आयपीएल 2022 मध्ये संघाला फायनलपर्यंत घेऊन जावू शकतो.
IPL Mega Auction मध्ये श्रेयस अय्यरला कोलकाता नाईट रायडर्सने 12 कोटी 25 लाखांना विकत घेतले होते. अय्यर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.