मुंबई : दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे उरलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेला मुकणार आहे. अजिंक्य रहाणेऐवजी आता श्रेयस अय्यरकडे मुंबईच्या टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या नॉक आऊट स्टेजमध्ये खेळू शकणार नाही. ग्रुप सीमधून मुंबई आणि रेल्वे या दोन टीम क्वालिफाय झाल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या ग्रुप-सीमध्ये मुंबईच्या टीमनं ६ पैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. या ग्रुपमध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर कायम आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी शॉ, सिद्धेश लाड, जय बिस्टा, आदित्य तरे आणि सूर्यकुमार यादव यांची मुंबईच्या १५ जणांच्या टीममध्ये निवड झाली आहे. तर बॉलरमध्ये धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, रॉयस्टन डायस आणि आकाश पारकर तर स्पिनर म्हणून ध्रुमील मटकर आणि शम्स मुलानी यांना संधी देण्यात आली आहे. मुंबई आणि कर्नाटकमध्ये शुक्रवारी होळकर स्टेडियममध्ये मॅच होईल.


अजिंक्य रहाणे हा सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेमध्ये फॉर्मसाठी झगडत होता. ग्रुप स्टेजच्या सामन्यांमध्ये रहाणेनं ९.६६ च्या सरासरीनं फक्त ५८ रन केले. तर दुसरीकडे मात्र श्रेयस अय्यरनं रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. सिक्कीमविरुद्ध श्रेयस अय्यरनं ५५ बॉलमध्ये १४७ रनची खेळी केली. श्रेयस अय्यरच्या या खेळीमध्ये तब्बल १५ सिक्स आणि ७ फोरचा समावेश होता. टी-२० क्रिकेटमधला कोणत्याही भारतीयाचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. यानंतर मध्य प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये १४३ रनचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरनं ५५ बॉलमध्ये नाबाद १०३ रन केले होते.


मुंबईकर श्रेयस अय्यरचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्कोअर


मुंबईची टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, जय बिस्टा, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, तुषार देशपांडे, आदित्य तरे, एकनाथ केरकर, शुभम रांजणे, आकाश पारकर, शम्स मुलानी, ध्रुमील मटकर, रॉयस्टन डायस