गोल्ड कोस्ट : २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा झालेय. महिलांच्या डबल ट्रप प्रकारात भारताच्या श्रेयसी सिंगने सुवर्णपदक मिळवलेय. याआधी ५० मीटर एअर पिस्टोल प्रकारात ओमप्रकाश मिथरवालने कांस्यपदक मिळवलेय. आतापर्यंत भारताच्या नावावर १२ सुवर्णपदकांची नोंद झालीये.


श्रेयसीला सुवर्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डबल ट्रॅप प्रकारात श्रेयसीने ऑस्ट्रेलियाच्या इमा कॉक्सला मागे टाकत अव्वल स्थाव मिळवले. इमाला रौप्यपदकावर समाधाना मानावे लागले. तिसऱ्या स्थानावर स्कॉटलंडच्या लिंडा पिअर्सन  राहिली.


मेरीचे पदक निश्चित


दुसरीकडे बॉक्सिंगमध्ये मेरी कोमने भारतासाठी पदक निश्चित केलेय. ४५-४८ किलो वजनी गटात मेरी कोमने फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता गोल्ड मेडल जिंकण्यापासून ती केवळ एक पाऊल दूर आहे. सेमीफायनलमध्ये मेरीच्या समोर श्रीलंकेच्या अनुषा दिलरुक्षीचे आव्हान होते. मात्र मेरीने तिला वरचढ होण्याची संधीच दिली नाही. तिने हा सामना ५-० असा जिंकला.


मंगळवारी भारताने केवळ दोन पदके जिंकली आणि येणाऱ्या दिवसांसाठी काही पदके निश्चित केली. आज भारताला नेमबाजी तसेच बॉक्सिंग, अॅथलेटिक्समध्ये पदकांची अपेक्षा आहे. पदक तालिकेत भारत २२ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.