अलूर : अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मॅन ऑफ द सीरिज ठरलेल्या शुभमन गिलची बॅट सध्या चांगलीच तळपत आहे.


पंजाबने कर्नाटकच्या टीमचा केला पराभव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्डकप नंतर आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये शुभमन गिलने आपली बॅटींगची जादू कायम ठेवली आहे. शुभमनने खेळलेल्या १२३ रन्सच्या जोरावर पंजाबने कर्नाटकच्या टीमचा पराभव केला आहे.


३ विकेट्स गमावत २६९ रन्स


खराब वातावरणामुळे ४२ ओव्हरच्या या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी आलेल्या पंजाबच्या टीमने ३ विकेट्स गमावत २६९ रन्स केले.


लोकेश राहुलची तुफानी बॅटिंग


या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या कर्नाटकच्या टीमकडून लोकेश राहुलने तुफानी बॅटिंग केली. लोकेश राहुलने १०७ रन्सची इनिंग खेळली. मात्र, लोकेश राहुलची ही खेळी विजय मिळवण्यात कामी आली नाही. कर्नाटकच्या टीमने ४२ ओव्हर्समध्ये ८ विकेट्स गमावत २६५ रन्स केले.


या मॅचमध्ये शुभमन गिलने १२२ बॉल्समध्ये आठ फोर आणि सहा सिक्सर लगावले आणि १२३ रन्सची इनिंग खेळली. मॅचच्या पहिल्याच बॉलमध्ये मनन वोहरा आऊट झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी शुभमनने मनदीप सिंह (६४) सोबत १२५ रन्सची पार्टनरशीप केली.


सिक्सर लगावत युवराज आणि हरभजनची बरोबरी


शुभमनने या मॅचमध्ये ६ सिक्सर लगावले. यासोबतच हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांची बरोबरी केली आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबच्या टीमकडून सर्वाधिक सिक्सर लगावणाऱ्यांमध्ये युवराज आणि हरभजनचं नाव अव्वल होतं. हरभजनने २०१४-१५ मध्ये गुजरातविरोधात ६ सिक्सर लगावले होते. तर, २०१५-१६मध्ये युवराजने मुंबईविरोधात ५ सिक्सर लगावले होते.