Shubhman Gill : बांगलादेशविरुद्ध शुभमन गिलचा नागिन डान्स; ठोकलं धमाकेदार शतक!
Shubhman Gill century : शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.
Shubhman Gill Century : भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने धमाकेदार शतक ठोकलं आहे. बांगलादेशने दिलेल्या २६६ धावांचं आव्हान पार करताना भारताची फलंदाजी डगमगली. रोहित शर्मा, तिलक वर्मा, केएल राहुल या प्रमुख फलंदाजांची विकेट घेतल्यानंतर शुभमन एकटा नडला. त्यावेळी त्याने वर्ल्ड रेकाॅर्ड देखील केलाय.
शुभमन गिलने यंदाच्या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये या वर्षात एक हजार धावांचा टप्पा ओलांडणारा गिल हा जगभरातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. आत्तापर्यंत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला देखील अशी कामगिरी करता आली नाही. विराट कोहलीचा विक्रम देखील शुभमन गिलने मोडीस काढला आहे. १२१ धावांची खेळी करत शुभमन बाद झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली. शमी आणि शार्दुल ठाकूर यांनी सलामीची फलंदाज फोडले. त्यानंतर बांगलादेशची अवस्था वाईट झाली होती. बांगलादेशच्या ५९ धावांवर ४ गड्यांनी तंबु गाठला होता. त्यानंतर मात्र, कॅप्टन शाकिब अल हसन याने ८० धावांची संयमी खेळी केली. तर तौहीद ह्रदोय याने देखील त्याला मोलाची साथ देत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर महेदी हसन आणि नसुम अहमद यांनी फिनिशिंग टच दिला.
टीम इंडियाकडून सुरूवातीला चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन पहायला मिळालं. मोहम्मद शमीने ८ ओव्हरमध्ये २ विकेट्स घेतल्या. तर शार्दुल ठाकूरने १० ओव्हरमध्ये ३ फलंदाजांना बाद केलं. त्याचबरोबर प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजाने १-१ गडी बाद केले. बांगलादेशने ५० ओव्हरमध्ये २६५ धावा उभ्या केल्या.
आणखी वाचा - 'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (विकेटकीपर), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.