अभिनेत्री सारा आणि क्रिकेटर शुभमन गिल यांच्या अफेअरची चर्चा, अखेर गिलने केला खुलासा
Sara ali khan Dates Shubhaman gill : सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु असताना शुभमनने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बॉलिवूडकर आणि क्रिकेटस्टार्स मधील संबंध सगळ्यांनाच माहित आहेत. बॉलिवूडचे अनेक अभिनेत्री हे भारतीय क्रिकेटर्ससोबत अनेकवेळा स्पॉट झाले आहेत. अनेकांच्या अफेअर्सची चर्चा होती. त्यात आता आणखी एक नाव जुडलं होतं. ते म्हणजे अभिनेत्री सारा अली खान ( Sara ali Khan ) आणि क्रिकेटर शुभमन गिल ( Shubhaman Gill ) यांचं. दोघांमध्ये जवळीक वाढल्याचं बोललं जात होतं. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. आता एका चॅट शो दरम्यान शुभमनने सारासोबतच्या अफेअरच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ( Shubman Gill reacts to rumours of dating Sara Ali Khan )
'दिल दियां गल्लन' या लोकप्रिय पंजाबी चॅट शोमध्ये शुभमनला प्रश्न विचारला गेला की, 'बॉलीवूडमधील सर्वात योग्य अभिनेत्री कोण आहे?' शुभमनने लगेच साराचे नाव घेतले. तेव्हा त्याला विचारण्यात आले, 'तू साराला डेट करतोय का?' यावर शुभमन म्हणाला, 'कदाचित'. त्यानंतर जेव्हा शुभमनला विचारण्यात आले की, साराची संपूर्ण सत्यता सांगा. तेव्हा तो लाजला आणि म्हणाला, 'साराचं संपूर्ण सत्य सांगितले आहे. कदाचित होय, कदाचित नाही.
फ्लाइटमध्ये स्पॉट
सारा अली खान आणि शुभमन अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. अलीकडेच, दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सारा फ्लाइटमध्ये काही चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसली. शुभमन साराच्या शेजारच्या सीटवर दिसला. काही दिवसांपूर्वी ते मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दिसले होते. याशिवाय ते दिल्लीतील एका हॉटेलबाहेरही स्पॉट झाले होते.
कार्तिक आर्यनला डेट
सारा आणि शुभमन यांचे चाहते दोघांच्या नात्याला अधिकृत दुजोरा कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. सारा अली खान याआधी कार्तिक आर्यनला डेट करत होती. त्यानंतर शुभमनचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले. पण हे दोघे कधीही सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले नाहीत आणि कधीही डेटिंगच्या बातम्यांची पुष्टी केली नाही. दोघेही सोशल मीडियावर फक्त एकमेकांच्या फोटोंवर कमेंट करताना दिसले.