Shubman Gill : सारा नव्हे तर `या` अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गिल? कमेंट करून सांगितलं सत्य
कधी शुभमनचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र आता त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय.
Shubman Gill Rashmika Mandanna: भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू शुभमन गिल (Shubman Gill) कोणत्या ना कोणत्या कारणाने फार चर्चेत असतो. कधी त्याचं नाव सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तर कधी सारा अली खानसोबत जोडलं जातं. मात्र फ्यूचर स्टार मानल्या जाणाऱ्या शुभमन गिलचं नाव नुकतंच अभिनेत्री रश्मिका मंधाना (Rashmika Mandanna) सोबत जोडलं जातंय. मात्र या सर्व अफवा असल्याचं खुद्द क्रिकेटर शुभमन गिलने स्पष्ट केलं आहे.
शुभमन आणि रश्मिकाच्या नावाची अफवा
एका बॉलिवूड गोष्टींच्या माहिती देणाऱ्या इन्स्टाग्राम पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये असा दावा केला गेला की, शुभमन गिलने मीडियाशी बोलताना अभिनेत्री रश्मिका मंधाना ही आपली क्रश (Shubman Gill Rashmika Mandanna Crush) असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर या इन्स्टाग्राम अकाऊंटने यासंदर्भात एक भलीमोठी पोस्ट देखील लिहिली आहे.
इन्स्टाग्रामवर पसरलेल्या अफवेच्या या पोस्टवर कमेंट करत शुभमन गिल म्हणाला की, ही कोणती मीडिया इंटरेक्शन होती, ज्याबद्दल मला स्वतःला माहिती नाहीये. गिलच्या या कमेंटवरून हे स्पष्ट होतंय की, या केवळ अफवा होत्या आणि लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जातायत.
स्टेडियममध्ये चाहत्यांनी शुभमनला चिडवलं
इंदूरच्या टेस्ट सामन्यात स्टेडियममध्ये असलेले प्रेक्षक शुभमनला साराच्या नावाने चिडवत असल्याची जोरदार चर्चा रंगली. ऑस्ट्रेलियाची टीम फलंदाजी करत असताना ही गोष्ट घडली. यावेळी गिल बाऊंड्री जवळ फिल्डींग करत होता. यावेळी त्याला पाहून प्रेक्षक “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो।” असे ओरडू लागले. इतकंच नाही तर साराच्या नावाने चिडवल्यानंतर लगेचच गिलने उस्मान ख्वाजाचा एक उत्तम कॅच पडला.
सारा आणि गिलच्या अफेअरची चर्चा
शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिल यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.