Shubman Gill : टीम इंडियातील ( Team India ) हँडसम हंक म्हणजे शुभमन गिल ( Shubman Gill ) . गेल्या काही दिवसांपासून शुभमन गिल फार चर्चेत आहे. तो चर्चेत येण्याचं कारण कधी त्याची उत्तम खेळी असते तर त्याच्या अफेअरच्या चर्चा. मात्र शुभमनने ( Shubman Gill ) फार कमी कालावधीत त्याचे भरपूर चाहते निर्माण केलेत. त्याने त्याच्या खेळीच्या जोरावर क्रिकेट विश्वामध्ये स्वतःची वेगळी जागा निर्माण केलीये. अवघ्या 23 वर्षीय हा तरूण क्रिकेटर नेमका किती कमावतो हे जाणून घेऊया. 


करियरसाठी सोडलं होतं घर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये शुभमन गिलचा ( Shubman Gill ) जन्म झाला आहे. 8 सप्टेंबर 1999 रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये शुभमनचा ( Shubman Gill ) जन्म झाला होता. शुभमनने सुरुवातीला पंजाबमधून त्याचं शिक्षणं पूर्ण केलं. वडिलांचं अपूर्ण स्वप्न शुभमनने पूर्ण केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 


शुभमन गिलचे वडील लखविंदर सिंह यांचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न होतं. मात्र स्वतःच्या बाबतीत ते हे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. यासाठी त्यांनी शुभमनला ( Shubman Gill ) खेळाडू बनवण्याचा निर्णय घेतला. यासाठी शुभमनला घर सोडून मोहालीला शिफ्ट व्हावं लागलं. मोहालीमध्ये येऊन त्याने त्याच्या क्रिकेट करियरला सुरुवात केली. 


शुभमनचं डोमेस्टिक क्रिकेट करियर कसं होतं?


2017 साली शुभमनने ( Shubman Gill ) लिस्ट ए क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. विदर्भाकडून त्याने डेब्यू केला होता. शिवाय याच वर्षी त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट करियरला देखील सुरुवात केली. 43 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये त्याने दहा शतकं ठोकत 3463 रन्स केले. 


किती आहे शुभमनचं नेटवर्थ?


टीम इंडियामध्ये पदार्पण करत शुभमनने ( Shubman Gill ) चांगला खेळ केला. याशिवाय आयपीएलमध्येही त्याची उत्तम खेळी पहायला मिळाली. शुभमन गिलची एकूण संपत्ती पाहिली तर ती 31 कोटींपेक्षाही जास्ट असल्याची माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिलचं ( Shubman Gill ) नेटवर्थ 2023 मध्ये जवळपास 4 मिलीयन डॉलर किंवा 31 कोटींपेक्षाही जास्त आहे. याचा अर्थ दर महिन्याला त्याची कमाई 66,09,280 रूपये इतकी आहे. 


शुभमन गिलला गाड्यांची आवड


शुभमन गिलला महागड्या आणि लॅविश गाड्यांची फार आवड आहेत. त्याच्याकडे गाड्याचं कलेक्शन आहे. त्याच्या या कलेक्शनमध्ये  रेंजर रोवर वेलर ( Ranger Rover Velar) आहे. ज्या गाडीची किंमत जवळपास 1.05 कोटी रूपये इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे महिंद्रा ठार ( Mahindra Thar ) असल्याचीही माहिती आहे.