टीम इंडियात सिद्धार्थ कौलला पहिल्यांदाच संधी, विराट सोबत खेळला आहे क्रिकेट
श्रीलंके विरूद्ध तीन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : श्रीलंके विरूद्ध तीन वनडे सामन्यांसाठी टीम इंडियाचा घोषणा करण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे सीरिजमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा असेल. विराट कोहलीला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आलीये. यासोबत टीममध्ये श्रीलंका दौ-यासाठी नव्या दमाचा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौल याला संधी देण्यात आलीये. त्याची ही टीम इंडियासाठी खेळण्याची पहिलीच वेळ आहे. सिद्धार्थने पंजाब टीममध्ये दमदार प्रदर्शन केल्याने त्याला संधी देण्यात आलीये.
आयपीएलचा अनुभव
१९ मे १९९० ला पंजाबच्या पठाणकोटमध्ये जन्मलेला सिद्धार्थ कौल आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविलस, कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. सध्या तो सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटचा अनुभव
फर्स्ट क्लास क्रिकेटच्या प्रदर्शनाबाबत सांगायचं तर सिद्धार्थ कौलने आतापर्यंत ५० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १७५ विकेट घेतल्या आहेत. इतक्याच सामन्यांमध्ये त्याने एका अर्धशतकाच्या सहायाने ५६६ रन्सही केले आहे. सिद्धार्थने २००७-०८ मध्ये पंजाबसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमधून डेब्यू केलं होतं. त्याचे दोन्ही भाई तेज आणि उदय सुद्धा फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत.
विराट सोबत अंडर १९ वर्ल्डकप
सिध्दार्थला सर्वात मोठी संधी २००८ मध्ये मलेशियामध्ये झालेल्या अंडर१९ वर्ल्डकपमध्ये मिळाली होती. त्यावेळी अंडर१९ टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीवर होती. त्या टीम वर्ल्डकप जिंकला होता. त्या सीरिजमध्ये सिद्धार्थने १५.४० च्या सरासरीने १० विकेट घेतल्या होत्या. पण त्यानंतर २०१२ पर्यंत तो जखमांमुळे बाहेर होता.
सिद्धार्थला व्हेरिएशनवर विश्वास
कौल याला त्याच्या व्हेरिएशनवर जास्त विश्वास आहे. तो म्हणतो की, जर तुमच्याकडे व्हेरिएशन आहे तर तुमचा बॉल फलंदाजाला समजणार नाही. कौल म्हणाला की, त्याने जहीर खानला २०११ वर्ल्ड्कपमध्ये पाहिल्यावर विशेष गोलंदाजी करणे शिकले.