मुंबई: आपल्या तुफान बॅटिंग सर्वाधिक धावा करून टीम इंडियाला टफ फाईट देत पराभूत करणाऱ्या स्टार फलंदाजाला आयसीसीने शिक्षा ठोठवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडून झालेल्या एका कृतीसाठी ICCने त्याला ही शिक्षा केली आहे. हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांग्लादेशचा कर्णधार तमीम इक्बाल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ढाका इथे झालेल्या बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजच्या तिसऱ्या वन डे सामन्यादौऱ्यान अभद्र भाषा वापरल्या प्रकरणी आयसीसीने बांग्लादेश संघाच्या कर्णधाराला दंड ठोठवला आहे. मॅच फीमधील 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली आहे. 


आयसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, खेळाडू आणि आयसीसीच्या सहयोगी सदस्यांसाठी आयसीसी आचारसंहिता कलम 2.3 मध्ये तामीम दोषी आढळला. यात 'आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अपमानकारक भाषेचा वापर' केल्यानं त्याला हा दंड आकारण्यात आला आहे. 



या दंडासोबतच तमीम इक्बालने केलेल्या या चुकीमुळे त्याला वॉर्निंग देखील देण्यात आली आहे. 24 महिन्यांमध्ये एखाद्या खेळाडूला 4 किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळतात तेव्हा त्याला निलंबित करण्यात येऊ शकते. 


शुक्रवारी बांगलादेशच्या 10 व्या ओव्हर दरम्यान तमीम इक्बाल याने आपल्या स्टम्पच्या मागून वाईट भाषा वापरली. या प्रकरणी त्याने नंतर माफीही देखील मागितली. मात्र आयसीसीने नियमानुसार त्याच्यावर दंड ठोठावला आहे. 


बांग्लादेशचा कर्णधार तमीम याने भारत आयसीसी 2007 वर्ल्ड कप लीगसाठी झालेल्या विरुद्ध बांग्लादेश सामन्यात तुफान फलंदाजी करून धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीनं संघाला विजय मिळवून दिला तर भारतीय संघाला पराभवामुळे बाहेर जावं लागलं होतं.