दुबई : भारतीय महिला टीमची ओपनर स्मृती मंधना ही यावर्षीची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयसीसीनं याची घोषणा केली आहे. स्मृती मंधनाची आयसीसीच्या वर्षाच्या सर्वोत्तम वनडे आणि टी-२० टीममध्येही निवड करण्यात आली आहे. स्मृती मंधनानं यावर्षी १२ वनडे मॅचमध्ये ६७ च्या सरासरीनं ६६९ रन आणि २५ टी-२० मॅचमध्ये तिनं १३०च्या स्ट्राईक रेटनं ६२२ रन केल्या. स्मृतीनं महिला टी-२० वर्ल्ड कपमध्येही चमकदार कामगिरी केली होती. स्मृतीनं वर्ल्ड कपच्या ५ मॅचमध्ये १२५.३५ च्या सरासरीनं १७८ रन केले. टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारतानं सेमी फायनलपर्यंत मजल मारली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती मंधनासोबतच पूनम यादवचाही वनडे आणि टी-२० टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. तर हरमनप्रीत कौरला आयसीसी वनडे टीमची कर्णधार बनवण्यात आलं आहे. महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीतनं १६०.५ च्या स्ट्राईक रेटनं १८३ रन केले. तर यावर्षात तिनं २५ मॅचमध्ये १२६.२ च्या स्ट्राईक रेटनं ६६३ रन केले. आयसीसीच्या टी-२० क्रमवारीमध्ये हरमनप्रीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


आयसीसीची वनडे टीम


स्मृती मंधना (भारत), टॅमी बेमाऊंट (इंग्लंड), सुझी बेट्स (कर्णधार, न्यूझीलंड), डेन वॅन निकर्क (दक्षिण आफ्रिका), सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), मरीझेन कॅप (दक्षिण आफ्रिका), डिनद्रा डॉटीन (वेस्ट इंडिज), सना मीर (पाकिस्तान), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), पूनम यादव (भारत)


आयसीसीची टी-२० टीम


स्मृती मंधना (भारत), एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया), सुझी बेट्स (न्यूझीलंड), हरमनप्रीत कौर (कर्णधार, भारत), नटाली स्किव्हर (इंग्लंड), एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया), ऍशलेघ गार्डनर (ऑस्ट्रेलिया), लिघ केसपेरेक (न्यूझीलंड), मगन स्कूट(ऑस्ट्रेलिया), रुमाना अहमद (बांगलादेश), पूनम यादव (भारत)