Smriti Mandhana Palash Munchhal Dating Rumours : कोणी सेलिब्रेटी कुठेही स्पॉट झाले की त्यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगायला सुरूवात होते. सध्या बी-टाऊनमध्ये अशीच काहीशी चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. हल्ली स्पोर्ट्सच्या खेळाडूचे बॉलिवूडची चांगलेच कनेक्शन (Bollywood) असल्याचे पाहायला मिळाले आहे. स्पोर्ट्स सेलिब्रेटी आणि बॉलिवूड सेलिब्रेटी हे विवाहबंधनातही अडकले आहेत. जसे की विराट कोल्ही आणि अनुष्का शर्मा, के.एल राहूल आणि अथिया शेट्टी. त्यात आता (Bollywood Celebrities) अजून एका जोडीची भर होणार आहे का अशा चर्चांना उधाण आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॅशनल क्रश स्मृती मंधाना (National Crush Smriti Mandhana) ही लोकप्रिय गायिका पलक मुच्छलच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. स्मृतीनं काल एक फोटो शेअर केला ज्यात तिनं पलकचा भाऊ पलाश मुच्छलला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 


त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा रंगलेल्या दिसत आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर नानातऱ्हेच्या प्रतिक्रियाही द्यायला सुरूवात केली आहे. स्मृतीचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. 26 वर्षीय स्मृती मंधाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. लहानपणापासून ती क्रिकेट खेळते आहे. सध्या वुमन्स प्रेमियर लिग गाजवते आहे. 2016 पासून ती पुर्णवेळ किक्रेटमध्ये सक्रिय आहे. सोशल मीडियावरही ती खूप सक्रिय आहे. सोबतच तिचे इन्टाग्राम 7.7M फॉलोवर्स आहेत. परंतु आता ते पलाश मुच्छलला (Palak Munchhal Brother) डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या चर्चांना उधाण आलं आहे. 


हेही वाचा - ''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव


यावेळी स्मृती ब्लॅक कलरच्या वनपीसमध्ये दिसत होती. तर पलाशनं कॅज्यूअल आऊटफीट परिधान केला होता. त्यानं ब्लॅक कलरची पॅन्ट आणि व्हाईट शर्ट घातला होता. यावेळी त्यांनी एकमेकांसोबत पोझ देत फोटो शेअर केले आहेत. यावेळी स्मृतीच्या या फोटोमुळे तिचे चाहतेही दु:खी झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''हा कोण आहे?'' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''ये देख के मेरा दिल टूट गया.'' अशाच एका युझरनं कमेंट केली आहे की, ''हा तिचा भाऊ असेल याच विचारानं मी जगतोय.'' तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''लग्न करू नकोस.'' 



तर काही युझर्सनं वेगळ्याच कमेंट्स करायला सुरूवात केली आहे. एका युझरनं लिहिलंय की, ''माफ कर स्मृती पण तुला यातून जास्त चांगला मुलगा मिळायला हवा.'' तर काहींनी ''क्यूटेस कपल'', ''नाईस जोडी'', ''तु त्याच्यासोबत कधी लग्न करतेय याची मी वाट पाहतोय.'', ''ब्युटिफूल टू'' अशा कमेंट्स केल्या आहेत तर काहींनी याची थट्टाही केली आहे. एकानं म्हटलंय ''हा काय हिचा बॉयफ्रेंड आहे?'' अशा तऱ्हेनं स्मृतीच्या या फोटोखाली अनेकांनी नाना तऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत परंतु जास्तकरून तिच्या चाहत्यांचे मनं दुखावलं गेले आहे.