''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव

Varsha Usgoankar in The Kapil Sharma Show: अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे फॅन फॉलोइंग हे प्रचंड आहे. वर्षा यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांना आपल्या आयुष्यात मजेदार किस्से शेअर केले सोबतच 'त्या' विचित्र अनुभवाबद्दलही(Weird Experience) सांगितले आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 24, 2023, 03:07 PM IST
''पहाटे दरावरची बेल वाजली अन्...'' वर्षा उसगांवकर यांनी सांगितला 'तो' विचित्र अनुभव title=
फाईल फोटो

Varsha Usgoankar: अभिनेता - अभिनेत्रींचे अनेक फॅन्स असतात ते त्यांना नानाऱ्हेने भेटत असतात. त्यांची एक झलक मिळवण्यासाठी इतके धडपडत असतात की काही विचारू नका. पुर्वी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांची सही मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड असायची परंतु आता आपल्या लाडक्या कलाकारासोबत सेल्फी (Bollywood) कधी मिळतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. सध्या आपल्या बाबतीत घडलेला असाच एक प्रकार अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी शेअर केला आहे.

त्यांनी नुकतीच 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) या शोला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत यावेळी संगीत बिजलानी, मंदाकिनी यांचीही उपस्थिती होती. यावेळी गप्पांमधून वर्षा उसगांवकर (Varsha Usgoankar) यांनी आपला शुटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. 

वर्षा उसगांवकर या सोशल मीडियावरही सक्रिय आहेत. ते त्यांचे फोटोज आणि अपडेट इन्टाग्रामवरही टाकत असतात. यावेळी त्यांना 'द कपिल शर्मा' या शोला हजेरी लावली होती त्याचा एक प्रोमोचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी वर्षा उसगांवकर यांनी निळीशार सुंदर अशी पैठणी (Varsha Usgoankar in Paithani) परिधान केली होती. यावेळी त्या या साडीत खुपच सुंदर दिसत होत्या. त्यांनी नाकात नथही परिधान केली होती. 

हेही वाचा - TMKOC: नक्की काय चाललंय? बबिताजींचाही निर्मात्यांकडून छळ, मोनिका भदौरियाचा दावा

यावेळी वर्षा उसगांवकर यांनी एक जुना किस्सा सांगितला आहे. आपल्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्सेही त्यांनी यावेळी सांगितले परंतु चाहत्यांमुळे आपल्याला कसा त्रास होतो याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, ''मी एकदा कोल्हापूरमध्ये शूटिंग करत होते. तेव्हा मी एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी साडेसहा वाजता माझ्या रूमची बेल वाजली, मला वाटलं की कोणी हाऊसकपिंगवालं आलं असेल. मी झोपेतून उठले होते. मी दार उघडलं आणि समोर पाहते तर माझा चाहता होता.'' तो मला म्हणाला की, ''मॅडम मला तुमची सही हवी आहे. त्यातून इतक्या सकाळी सकाळी त्यानं माझी सही मागितली म्हणून मी त्याला ओरडले.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यापुढे त्या म्हणाले त्यांना असाच एक दुसरा अनुभव आला होता की, ''मी एकदा ट्रेननं प्रवास करत होते तेव्हा अचानक माझा एका चाहता आला आणि त्यानं मला सांगितले की, माझं स्टेशन हे जवळ येते आहे तर मला तुमची सही हवी आहे.'' असे विचित्र अनुभव कलाकारांना अनेकदा येताना दिसतात. त्यामुळे कलाकारांसाठीही ही एक अटीतटीची वेळ असते. सध्या त्या 'द कपिल शर्मा' या शोमध्ये येणार असल्यानं चाहते त्यांच्या गप्पा ऐकण्यास उत्सुक आहेत.