मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार सोनू सूद कोरोना काळात गरजूंसाठी देवमाणूस बनला आहे. जेवढं शक्य आहे तेवढी मदत सोनू करत आहे. फक्त गरजूंनाच नाही तर कलाकार आणि खेळाडूंना देखील तो मदत करत आहे. कोलकाता संघातील स्टार खेळाडू हरभजन सिंगने देखील ट्वीट करत मदत मागितली होती. हा मेसेज सोनूपर्यंत पोहोचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनूने हरभजन सिंहला मदत केली आहे. हरभजन सिंगने 12 मे रोजी ट्वीट करत एक रेमडेसीवीर इंजेक्शन तातडीनं हवं असल्याचं आवाहन केलं. त्याखाली पत्ता आणि फोननंबरही दिला होता. त्यानंतर सोनूपर्यंत हा मेसेज पोहोचल्यावर त्याने काम होईल असा रिप्लाय देखील दिला आहे. 





सोनूने मदत केल्यानंतर हरभजन सिंगने सोनूचे ट्वीटरवर खूप आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेश रैनाने ट्वीटरवर मदत मागितली होती. तो मेसेज वाचून सोनूनं त्याला मदत केली होती. सुरेश रैनाच्या कुटुंबातील एका व्यक्तीसाठी ऑक्सिजनची आवश्यकता होती. त्यावेळी सोनूने मदत केली होती. सुरैश रैनानं सोनूचे आभार मानले होते. 


सोनू सूदने गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेक गरजू लोकांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी तर अगदी धान्यापासून ते आवश्यक वस्तूंपर्यंत मदत केली आहे. आता देखील सोनू सूद देवासारखं लोकांच्या मदतीला धावून येत आहे.