`रोहितला कॅप्टन बनवण्यासाठी...`, सौरव गांगुलीचा मोठा खुलासा; म्हणाला `विराटची इच्छा नव्हती तरी...`
Sourav Ganguly On Rohit Sharma : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलपूर्वी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहितला टीम इंडियाची कॅप्टन्सी कशी मिळाली? यावर खुलासा केलाय.
T20 World Cup 2024 Final : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात खेळली जाणार आहे. अशातच आता कोणता संघ जिंकणार? यावर अनेक चर्चा होताना दिसत आहे. अशातच आता बीसीसीचे माजी अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं. जर भारतीय संघ अपयशी ठरला, तर कर्णधार रोहित समुद्रात उडी मारेल, असं वक्तव्य गांगुलीने गमतीने केलं होतं. त्यावेळी बोलताना गांगुलीने रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन कसा झाला? यावर खुलासा केलाय.
काय म्हणाला सौरव गांगुली?
रोहित शर्माने एक नव्हे तर दोन वर्ल्ड कप फायनल खेळले आहेत. यावरुन तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं नेतृत्वगुण यातून दिसून येतं. त्यामुळे रोहितच्या यशाबद्दल मला आश्चर्य वाटत नाही. कारण मी बीसीसीआय अध्यक्ष असताना रोहित शर्मा कर्णधार झाला होता, असं सौरव गांगुलीने म्हटलं. त्यावेळी त्याने रोहित टीम इंडियाचा कॅप्टन कसा झाला? यावर देखील भाष्य केलं.
कॅप्टन्सीसाठी तयार नव्हता रोहित
टीम इंडिया पराभवाला सामोरं जात असताना विराट कोहली कर्णधारपद सांभाळू इच्छित नव्हता. परंतू दुसरीकडे रोहित देखील कर्णधार होण्यासाठी तयार नव्हता. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्हा सर्वांना खूप मेहनत घ्यावी लागली होती, असं गांगुली सांगतो. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची प्रगती पाहून मला खूप आनंद झाला, असंही सौरव गांगुलीने म्हटलं आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या नावावर दोन आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा रेकॉर्ड देखील आहे. नक्कीच त्याच्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. आयपीएल जिंकणं सोपी गोष्ट नसते. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला 14-14 सामने जिंकावे लागतात. तेव्हा तुम्ही आयपीएलचे विजेतेपद मिळवता. टीम इंडियासाठी तो उत्तम कमगिरी करतोय, असं म्हणत गांगुलीने रोहित शर्माचं कौतूक केलंय.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.