Sourav Ganguly: `वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...`, सचिनचं उदाहरण देत गांगुलीने रोहितला दिला `हा` सल्ला!
Indian Cricket Team: आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
Sourav Ganguly On Team India : आगामी आशिया कप स्पर्धेसाठी 17 जणांची टीम बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आली आहे. चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनी पत्रकार परिषद घेत टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध येत्या 2 तारखेला विजयाचा नारळ फोडेल. आशिया कपची टीम आगामी वर्ल्ड कपची लिटमस टेस्ट असणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाच्या प्रदर्शनावर आता सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी स्टार खेळाडू सौरव गांगुली याने मोठं वक्तव्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाला सौरव गांगुली?
टीम इंडियाकडे प्रचंड प्रतिभा आहे. आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही अशा तक्रारी मी सतत ऐकत असतो, परंतु आमच्याकडे बरंच काही आहे आणि समस्या अशी आहे की आम्ही निर्णय घेऊ शकत नाही, असं सौरव गांगुली म्हणाला आहे. राहुल द्रविड, सिलेक्टर्स आणि रोहित शर्मा यांनी फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी एका खेळाडूचा निर्णय घ्यावा आणि त्याला सलग सामन्यांमध्ये संधी द्यावी, असा सल्ला सौरव गांगुलीने दिला आहे.
टीममधील चौथा क्रमांक असा आहे, जिथं कोणताही खेळाडू फिट होऊ शकतो. मात्र, या खेळाडूवर खुप जबाबदाऱ्या असतात. मी देखील सुरूवातीच्या काळात मिडल ऑर्डरला खेळलो होतो. त्यावेळी मला त्यावेळच्या कॅप्टन सचिन तेंडूलकरने देखील सल्ला दिला होता. सचिन जेव्हा टीममध्ये आला तेव्हा तो देखील सहाव्या क्रमांकावर खेळत होता. ज्यावेळी त्याला वर खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा तो सर्वोकृष्ट खेळाडू ठरला, असं गांगुली म्हणतो. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मिडल ऑर्डर महत्त्वाची आहे. त्यावेळी त्याने तीन पर्याय देखील सुचवले. विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्यासारखे खेळाडू तयार आहेत, असं गांगुली म्हणतो.
कोणत्या खेळाडूंना संधी?
आशिया कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा... राखीव खेळाडू : संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर)
एशिया कपचं शेड्यूल (Asia Cup schedule)
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर