मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात पुन्हा पुनरागमन करणार आहे. स्वत: गांगुलीने या संदर्भात पोस्ट टाकत माहिती दिली आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांसाठी ही पर्वणीच असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिजेंड लीग क्रिकेटने नुकतेच जाहीर केले होते की, आगामी हंगाम भारतात आयोजित केला जाईल, अशी माहीती दिली होती. त्यानंतर आता गांगुलीने, लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सीझन 2 मध्ये एक विशेष सामना खेळणार असल्याची माहीती दिली आहे.  


इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय?
सौरव गांगुलीने लिजेंड सामन्यासाठी तयारी सुरू केली आहे. जिममध्ये तो घाम गाळताना दिसत आहे. गांगुलीने या जिमचे स्वतःचे फोटो देखील पोस्ट केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने आपल्या लीजेंड्स लीग क्रिकेट खेळत असल्याची पुष्टी केली आहे.   


गांगुलीने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आझादी का अमृत महोत्सवानिमित्त चॅरीटी सामन्यातून निधी उभारण्यासाठी ट्रेनिंगचा आनंद घेत आहे.भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे आणि  दिग्गज खेळाडूंसोबत महिला सशक्तीकरणासाठी लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये लवकरच क्रिकेटस बॉल्सला हिट करायचंय. 


लीजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक आणि सीईओ रमण रहेजा यांनी सांगितले की , “आम्ही दिग्गज सौरव गांगुलीचे इतर दिग्गजांसह सामने खेळल्याबद्दल आभारी आहोत. दिग्गज नेहमीच एक दिग्गज असतो. दादा क्रिकेटसाठी नेहमीच तयार असतात. तो एक विशेष चॅरिटी सामना खेळणार आहे, जो आमच्या प्रेक्षकांसाठी खूप आनंददायी ठरणार आहे. आम्ही दादाचे काही अप्रतिम शॉट्स पाहण्यासाठी उत्सुक आहोत.


कारकीर्द
सौरव गांगुलीने 113 कसोटी आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे आणि त्याने सर्व फॉरमॅटमध्ये 18,575 धावा केल्या आहेत. त्याने एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील 195 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यापैकी 97 जिंकले. गांगुलीने 1996 च्या उन्हाळ्यात इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि लॉर्ड्सवरील त्याच्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले.