मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटदरम्यान अनेक खेळाडू स्लेजिंगचे शिकार होत असतात. एकेकाळी दादा  म्हणजे सौरव गांगुली यांनाही त्याचा मोठा सामना करावा लागला होता. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ कर्णधार म्हणून दादाचं नाव घेतलं जातं. सौरव गांगुली यांनी 1996मध्ये टेस्ट डेब्यू दरम्यान पहिल्याच सामन्यात स्लेजिंगचा सामना करावा लागला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सौरव गांगुली यांनी टेस्ट डेब्यूमध्ये इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानात शतक ठोकलं होतं. त्या सामन्याआधी 1992मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान वन डेमध्ये डेब्यू करण्याची संधी मिळाली होती. टेस्ट डेब्यू दरम्यानचा एक किस्सा त्यांनी शेअर केला आहे. 


या टेस्ट सामन्यादरम्यान सौरव गांगुली यांना स्लेजिंगचे शिकार बनले आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काहीही न बोलताच आपल्या शतकी खेळीनं इंग्लंडच्या खेळाडूंची त्यांनी बोलती बंद केली होती. 


लग्न न करण्याचा पाढा वाचणाऱ्या मुरलीधरन यांची 10 मिनिटांत या तरुणीनं काढली विकेट


सौरव गांगुली यांनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात स्लेज करण्यात आलं. त्यांचं लक्ष विचलित करण्याचा इंग्लंडच्या खेळाडूंनी खूप प्रयत्न केला. त्यावर प्रत्युत्तर म्हणून गांगुली यांनी शतक ठोकत सर्वांची बोलती बंद केली. शतक पूर्ण झाल्यानंतर गांगुली यांनी जेवण केलं. 


20 ते 24 जून 1996 दरम्यान गांगुली यांनी इंग्लंड विरुद्ध सामन्यातून आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात पदार्पण केलं. सौरव गांगुली यांनी आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात 131 धावा केल्या होत्या. 1996 ते 2008 त्यांनी एकूण 113 सामने खेळले. या 113 सामन्यांमध्ये मिळून त्यांनी 7212 धावा केल्या आहेत.