Sourav Ganguly Reply to Shoaib Akhtar: विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्यात छुपा वाद तर सर्वांना माहित आहे. गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना विराट कोहलीने (Virat Kohli) टीम इंडियाच्या (team india) कॅप्टन्सीचा राजीनामा दिली होता. त्यानंतर कोहली आणि गांगुली यांच्यातील वादावर सर्वत्र चर्चा झाली. बीसीसीआय (BCCI) विराटला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी कुठलाही दबाव टाकला नव्हता, त्याने तो निर्णय स्वच्छेने घेतला होता, असं स्पष्टीकरण गांगुलीने दिलं होतं. तर विराटने देखील गांगुलीवर (Kohli vs Ganguly) कोणताही आरोप केला नव्हता. मात्र, दोन्ही खेळाडूंमध्ये छुपा वाद असल्याच्या चर्चा मात्र कमी होत नव्हत्या. अशातच आता पुन्हा एकदा भावकीतील वाद विसरून गांगुलीने विराटचा बचाव करत शोएब अख्तरला (Shoaib Akhtar) शिंगावर घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या मर्यादित षटकांतून निवृत्ती घेण्याचा सल्ला शोएब अख्तरने दिला होता. त्यावर आता सौरव गांगुलीने चोख प्रत्युत्तर देत अख्तरची बोलती बंद केली आहे. विराट कोहलीने आपली कसोटी कारकीर्द अधिक बळकट करण्यासाठी वनडे आणि टी-ट्वेंटी या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यावी, असं शोएब अख्तर म्हणाला होता. लिमिटेड ओव्हर क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर त्याचे सर्व लक्ष आणि ऊर्जा कसोटी क्रिकेटवर केंद्रित करू शकतो. यामुळे तो अनेक वर्षे क्रिकेट खेळू शकतो. त्याचबरोबर सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मागे टाकू शकतो, असंही शोएब अख्तर म्हणाला होता. बॅकस्टेज विथ बोरिया या शोमध्ये त्याने हे वक्तव्य केलं होतं. त्यावर आता सौरव गांगुलीने पलटवार केला आहे.


Sourav Ganguly म्हणतो...


शोएब अख्तरच्या या वक्तव्यावर सौरव गांगुलीला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने अख्तरचं वक्तव्य निरर्थक असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीने मर्यादित ओव्हरमधून निवृत्ती का घ्यावी?  त्याला जे क्रिकेट खेळायचे आहे ते खेळावं कारण तो टीमकडून चांगला परफॉर्म करतो. विराटला कोणत्याही फॉरमॅटमधून माघार घेण्याची गरज नाही, असं रोखठोक मत सौरव गांगुलीने मांडलं आहे.


आणखी वाचा - Rinku Singh: 'आईने कर्ज काढून मला...', टीम इंडियासाठी डेब्यू झाल्यावर रिंकू सिंह भावूक


दरम्यान, शोएब अख्तरने मुलाखतीत बोलत असताना पाकिस्तानला घरचा आहेर दिला होता. पहिल्या दिवसापासून मी म्हणतोय की, पाकिस्तानला भारतात वनडे विश्वचषक खेळण्यासाठी गेले पाहिजे. कारण भारताच्या पैशावरच आपले क्रिकेट पुढे जात आहे, असं म्हणत पाकिस्तानला त्यांचं स्थान दाखवून दिलंय. त्यावेळी, आम्हाला सत्याचा सामना करावा लागेल. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त पैसा भारतातून येतो आणि आयसीसी त्याच पैशांचा वापर करते, असंही तो म्हटला आहे.