सेंच्युरिअन : युझवेंद्र चहलच्या स्पिनपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी लोटांगण घातलं आहे. दुसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ११८ रन्सवर ऑल आऊट झाला आहे. टॉस जिंकून पहिले बॉलिंग घ्यायचा कोहलीचा निर्णय भारतीय बॉलर्सनी योग्य ठरवला. भारताकडून युझवेंद्र चहलनं ५, कुलदीप यादवनं ३ तर भुवनेश्वर कुमार-जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी १-१ विकेट घेतली.


दक्षिण आफ्रिकेचा जेपी डुमिनी आणि खाया झोंडोनं सर्वाधिक २५ रन्स केल्या. पहिल्या वनडेमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. त्यानंतर आता या वनडेमध्येही शानदार विजय मिळवून ६ वनडेच्या या सीरिजमध्ये भारताला २-०नं आघाडी घ्यायची सुवर्ण संधी चालून आली आहे. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा