मुंबई : भारताविरुद्धच्या टी-२० आणि टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात १५ तारखेपासून दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये दक्षिण आफ्रिका टी-२० आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. टेस्ट सीरिजचं नेतृत्व फॅफ डुप्लेसिसकडे तर टी-२० सीरिजचं नेतृत्व क्विंटन डिकॉककडे देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-२० सीरिजपासून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. रस्सी वॅन-डर डुसेन याला टी-२० टीमचं उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. तर टेम्बा बवुमा टेस्ट सीरिजसाठी उपकर्णधार असेल. टेम्बा बवुमा हा टेस्ट मध्ये शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये कृष्णवर्णीय बॉलरचाच बोलबाला राहिला आहे. बवुमाने ३६ टेस्ट मॅचमध्ये ३३ च्या सरासरीने १,७१६ रन केले आहेत, यामध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकांचा समावेश आहे.


दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी काही नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. फास्ट बॉलर एनरिच नोर्टजे, स्पिन ऑलराऊंडर सेनुरैन मुथुस्वामी आणि विकेट कीपर रुडी सेकंड यांची टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली आहे.


या दोन्ही टीममध्ये पहिले ३ टी-20 मॅचची सीरिज होईल आणि मग ३ टेस्ट मॅच खेळल्या जातील. वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी निराशाजनक झाली. पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर राहिली.


दक्षिण आफ्रिकेची टेस्ट टीम


फॅफ डुप्लेसिस (कर्णधार), टेम्बा बवुमा, थियुनिस डि ब्रुयुन, क्विंटन डिकॉक, डीन एल्गार, जुबैर हमजा, केशव महाराज, एडन मार्करम, सेनुरैन मुथुस्वामी, लुंगी एनगिडी, एनरिच नोर्टजे, वर्नन फिलेंडर, डेन पिड्ट, कगिसो रबाडा, रुडी सेकंड


टी-२० टीम


क्विंटन डिकॉक (कर्णधार), रस्सी व्हॅन डर ड्यूसेन, टेंबा बवुमा, ज्युनियर डाला, बोर्न फोर्टुइन, ब्युरन हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नॉर्टजे, अ‍ॅन्डिले फेहुकुयो, ड्वेन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, जॉन-जॉन स्मट्स, तबरेज शम्सी