Mike Procter in ICU : साऊथ अफ्रिका क्रिकेटमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. साऊथ अफ्रिका क्रिकेट संघाचे माजी कोच आणि महान फलंदाज राहिलेल्या माईक प्रॉक्टर (Mike Procter) यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. माईक प्रॉक्टर यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका (Cardiac Arrest) आला. त्यानंतर आता माईक प्रॉक्टर सध्या मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारपासून त्यांची प्रकृती अधिक गंभीर असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माईक प्रॉक्टरला डर्बनजवळील एका हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू असताना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. ज्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं, अशी माहिती त्यांच्या कुटूंबियांनी दिली होती. एएफपीशीला दिलेल्या हेल्थ रिपोर्टनुसार, माईक प्रॉक्टर यांना तातडीने रुग्णलयात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियादरम्यान त्यांना हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये हसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलंय.


माईक प्रॉक्टर यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटसाठी मोलाचं योगदान दिलंय. खेळाडूंना क्रिकेटची गोडी लागावी किंवा युवा खेळाडूंना संघात सामील करू घ्यावं, यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले. 401 प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये प्रॉक्टरने 36 च्या सरासरीने 21 हजार 936 धावा कुटल्या. तर 1967 ते 1970 या काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मोलाचं योगदान दिलं. त्यांनी 7 कसोटी सामन्यापैंकी 6 सामन्यात विजय मिळवून दिला होता. मात्र, 1970 मध्ये त्यांना वर्षभेदाचा सामना करावा लागला. त्यांना संघातून डच्चू देण्यात आला. पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेट आणि लिस्ट ए क्रिकेट खेळणं सोडलं नाही. 



माईक प्रॉक्टर यांनी कारकिर्दीत 48 शतके आणि 109 अर्धशतक झळकावली. तर गोलंदाजीत देखील त्यांची मदार होती. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी 1417 विकेट्स नावावर केल्या आहेत. अशी कामगिरी करणारे ते साउथ अफ्रिकेचे एकमेव खेळाडू आहेत. तर साऊथ अफ्रिका संघासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनिय कामगिरी केलीये. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये साऊथ अफ्रिका संघाचे कोच म्हणून त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली आहे.