नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर मोर्न मॉर्कलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४ मॅचची टेस्ट सिरीज त्याच्या करियरच शेवटची सिरीज असेल.


५२९ विकेट्स 



 ३३ वर्षीय बॉलरने आफ्रिकेसाठी ८३ टेस्ट, ११७ वनडे आणि ४४ टी २० मॅच खेळल्या. त्याचे करियर १२ वर्षांचे राहिले.


यामध्ये त्याने २९४ टेस्ट विकेट घेतल्या. तीनही फॉर्मेटमध्ये मिळून त्याने ५२९ विकेट्स घेतल्या. 


नवा पाठ सुरू 


हे माझ्यासाठी खूप कठिण होतं.  पण आयुष्यातील नवा पाठ सुरू करण्याची हीच वेळ आहे.


सध्याचे आंतरराष्ट्रीय शेड्यूल्ड खूप व्यस्त आहे. अशात परिवाराला वेळ देण्यासाठी मी हा निर्णय घेतलाय. असे त्याने सांगितले. 


माझ्यात क्रिकेट बाकी 


 ''मला आताही वाटतय की माझ्या आत खूप क्रिकेट बाकी आहे. पुढे काय होईल याबद्दल मी उत्सूक आहे.


सध्या माझं पूर्ण लक्ष आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या आगामी सिरीजकडे असल्याचे'ही त्याने सांगितले.