भारताची अट पाकिस्तानने मान्य केली नाही, तर `या` देशात होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
Champions Trophy 2025 : बीसीसीआयने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025 ) खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही असे आयसीसीला स्पष्ट केले आहे. भारत सरकारने बीसीसीआयला भारतीय क्रिकेट टीम पाकिस्तानात पाठवण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे आता ही सूचना पाकिस्तानला मिळाल्यामुळे ते चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी नव्या ऑप्शनच्या शोधात आहेत. जर पाकिस्तान ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने आयोजित करण्यास तयार झाला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद हे दुसऱ्या देशाला देण्यात येऊ शकत अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाण्यास तयार नाही. तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी हाइब्रिड मॉडलने खेळवण्यास तयार नाही. पीसीबीला भारताचे सामने हे न्यूट्रल वेन्यूवर होऊ द्यायचे नाहीत. पीसीबीने याबाबत पाकिस्तान सरकारची चर्चा केली असून डॉन डॉट कॉमच्या एका रिपोर्टनुसार पाकिस्तान सरकार पीसीबीला यावरून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून हटण्यास सांगू शकते. यासोबतच पाकिस्तान सरकार पीसीबीला आयसीसी किंवा एशिया कप टूर्नामेंटमध्ये भारताविरुद्ध सामने खेळण्यास परवानगी नाकारू शकते.
हायब्रीड मॉडेलने आयोजित केली जाणार स्पर्धा?
पीटीआयच्या एका रिपोर्टनुसार, भारताने पाकिस्तानात येऊन चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्यामुळे आयसीसी आता ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याची योजना आखात आहे. जर हायब्रीड मॉडेलने ही स्पर्धा खेळवली गेली तर पीसीबीला या स्पर्धेचे संपूर्ण होस्टिंग अधिकार मिळतील. पण जर पीसीबीने या स्पर्धेसाठी हायब्रीड मॉडेल मान्य केले नाही तर कदाचित पाकिस्तानकडून होस्टिंगचे अधिकार काढून घेतले जाऊ शकतात. पण पीसीबीने म्हंटले आहे की अद्याप त्यांच्याशी हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा खेळवण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.
हेही वाचा : मांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा
दक्षिण आफ्रिकेत होऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफी :
पीटीआयच्या रिपोर्टमध्ये पुढे म्हटलं आहे की आयसीसीने पीसीबीला पत्र लिहून विचारले आहे की हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यासाठी ते तयार आहेत का? जर पाकिस्तान याच्याशी सहमत नसेल तर या आयसीसी स्पर्धेच यजमानपद साऊथ आफ्रिकेला देण्यात येईल. परंतु आतापर्यंत पीसीबीने याबाबत कोणतेही उत्तर दिलेले नाही. असं म्हंटलं जात आहे की पीसीबी सध्या पाकिस्तान सरकारशी याबाबत चर्चा करत आहे. भारतीय क्रिकेट संघ हा 2008 आशिया कपनंतर पाकिस्तानमध्ये जाऊन खेळलेला नाही. 2023 मध्ये सुद्धा पाकिस्तानमध्ये आशिया कपचं आयोजन केलेलं असताना भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलने खेळवली गेली.