मांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात कॉमेंट्री करताना हा किस्सा शेअर केला.  त्याने सांगितले की त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता. 

पुजा पवार | Updated: Nov 12, 2024, 12:29 PM IST
मांजरीचे केस कापण्यासाठी 'या' माजी क्रिकेटपटूने खर्च केले 1 लाख 85 रुपये; स्वत: सांगितला किस्सा title=
(Photo Credit : Social Media)

Wasim Akram Cat : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (Wasim Akram) हा नेहमी त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतो. मात्र आता अकरम एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आलेला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वसीम अकरम याने त्याच्या मांजरीचे केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले जेवढ्या पैशात नवा कोरा आयफोन आला असता. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सध्या वनडे सीरिज खेळवली जात असून यात वसीम अकरम कॉमेंटेटर म्हणून भूमिका निभावत आहे. यावेळीच वसीमने हा किस्सा शेअर करत सांगितले की त्याने त्याच्या मांजरीची केस कापण्यासाठी एवढे पैसे खर्च केले कि त्या पैशात तो 200 मांजरी खरेदी करू शकला असता. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना वसीम अकरमने त्याच्या सोबत झालेली विचित्र घटना सांगितली. यात वसीमने सांगितले कि तो त्याच्या मांजरीचे केस कापण्यासाठी एका प्राण्यांच्या सलूनमध्ये गेला होता. यावेळी त्याने मांजरीचे केस कापण्यासाठी एकूण 1000 ऑस्ट्रेलियाई डॉलर खर्च केले. भारतीय रुपयांमध्ये 1000 ऑस्ट्रेलियाई डॉलर म्हणजे 56000 हजार रुपये होतात. तर पाकिस्तानी रुपयांनुसार हे एकूण 1 लाख 85 हजार रुपये होतात. एवढ्या किंमतीत एक नवा आयफोन येऊ शकतो. वसीमने हा किस्सा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान वनडे सीरीजची कॉमेंट्री करताना सांगितला. हा किस्सा ऐकून त्याच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सर्वजण हसू लागले.

हेही वाचा : 'ना त्याची वागणूक चांगली आहे, ना...', गंभीरची पत्रकार परिषद पाहून संतापले मांजरेकर; बीसीसीआयला केली विनंती

 

पाहा व्हिडीओ : 

पाकिस्तानने वनडे सिरीज जिंकून रचला इतिहास : 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाचा तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. रविवारी पाकिस्तानने तिसऱ्या वनडे सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 22 वर्षांनी वनडे मालिका जिंकली. यापूर्वी 2002 मध्ये पाकिस्तानने ऑस्ट्रेलियामध्ये वांदे सीरिज जिंकली होती. आता टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे.