मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटवर मोठं संकट ओढावलं आहे. दक्षिण आफ्रिकेचं क्रिकेट बोर्ड असलेल्या 'क्रिकेट साऊथ आफ्रिका'वर सरकारी संस्था स्पोर्ट्स कॉन्फेड्रेशन ऍण्ड ऑलिम्पिक कमिटी (SASCOC)ने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. 



आयसीसीच्या नियमांनुसार कोणत्याही क्रिकेट बोर्डात तिथलं सरकार दखल देऊ शकत नाही. असं झालं तर आयसीसी त्या क्रिकेट बोर्डाची मान्यता रद्द करते. दक्षिण आफ्रिका सरकारने आपलं नियंत्रण बोर्डावर आणलं आहे, त्यामुळे आयसीसी कडक पावलं उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.