Kagiso Rabada Viral Video : वर्ल्ड कप 2023 च्या तिसऱ्या सामन्यात साऊथ अफ्रिकेच्या 3 खेळाडूंनी धमाकेदार शतक ठोकलं अन् वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा 428 धावांचा डोंगर उभारला. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock), रॅसी व्हॅन डर डुसेन (Rassie van der Dussen) आणि एडम मार्करमच्या (Aiden Markram) यांनी श्रीलंकेविरुद्ध शतक ठोकलंय. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी इनिंगमध्ये 59 फोर मारले अन् वर्ल्ड कपमधील आणखी एक रेकॉर्ड मोडून काढलाय. या सामन्यात रॅसी व्हॅन डर डुसेन याने देखील वादळी खेळी केली. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेच्या डगआऊटमध्ये आनंदाचं वातावरण दिसत होतं. मात्र, आनंदाच्या उत्सवात  रबाडाच्या (Kagiso Rabada) इज्जतीचा फालुदा झाल्याचं पहायला मिळालंय. त्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॅसी व्हॅन डर डुसेनने त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकीर्दीतील पाचवं शतक पूर्ण केलं. संपूर्ण दक्षिण आफ्रिकेच्या संघानं त्याचं शतक साजरं केलं. त्याचवेळी, कागिसो रबाडा देखील ड्रेसिंग रूममध्ये रसी वान दार दुसेनचं शतक साजरं करताना दिसला. त्यावेळी रबाडासोबत धक्कादायक घटना घडली. टाळ्या वाजवत असताना रबाडाच्या कमरेवरील टॉवेल अचानक घसरला. त्याची ही उप्स मुव्हमेंट कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यावेळी खुद्द रबाडा देखील हसू आवरता आलं नाही. 


पाहा Video



दरम्यान, एडन मार्करामने अवघ्या 49 चेंडूत धडाकेबाज शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात 54 चेंडूंचा सामना करणार्‍या मार्करामने 106 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावात 59 चौकार आणि 14 सिक्स ठोकले अन् 428 ची धावसंख्या उभी केली.


श्रीलंका : कुसल परेरा, पाथुम निसांका, कुसल मेंडिस (WK), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (C), दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा.


साऊथ अफ्रिका : क्विंटन डी कॉक (WK), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा.