मुंबई : बघता बघता  २०१७ हे वर्षदेखील संपलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेटलाही हे वर्ष खास ठरलं आहे. यंदाच्या वर्षी भारताप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील क्रिकेट विश्वामध्ये अनेक बदल झाले. अनेक चांगल्या वाईट घडामोडी घडल्या. 


भारतीय क्रिकेट 


 क्रिकेट हा केवळ पुरूषांचा खेळ नव्हे तर स्त्रियादेखील या खेळामध्ये आता खूपच तरबेज झाल्या आहे.  यंदा भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. 
 
 विराट कोहली ने नवं नेतृत्त्व भारतीय क्रिकेट संघाला मिळाले  आहे. विराटने स्वतःच्या खेळामध्ये कमालीची सुधारणा केली आहे. अनेक शतकांचे विक्रम नावावर केले आहेत. 



 
 आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमधील घडामोडी 


 
 पाकिस्तान संघाने यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे.  पण क्रिकेट आणि २०१७ यामध्येहे समीकरण लक्षात ठेवायचे असेल तर अनेक क्रिकेटप्रेमींच्या डोक्यातून दक्षिण आफ्रिका विरूद्ध श्रीलंका दरम्यानचा तिसरा वनडे सामना जाऊच शकत नाही.  


 
 दक्षिण आफ्रिका विरूद्ध श्रीलंकेदरम्यान सामन्यात काय झाले ?  


 
 या सामन्यादरम्यान मधमाशींनी खेळाडूंवर हल्ला केला होता. या  हल्ल्यामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात आला होता. खेळामध्ये मधमाश्यांचा व्यत्यय येण्याचा हा पहिलाच प्रकार होता. या हल्ल्याचे लाईव्ह प्रक्षेपणदेखील करण्यात आले होते.  
 
 ५ फेब्रुवारी रोजी जोहान्सबर्ग येथील वांडरर्स स्टेडियममध्ये हा हल्ला झाला होता. दरम्यान सारेच खेळाडू मैदानावर झोपले होते. 


 



 
स्कोर काय ? 


मधमाश्यांचा हल्ला झाला तेव्हा २५.४ ओव्हर सुरू होती. यावेळेस श्रीलंकेचा स्कोर 115 धावा आणि 4 विकेट्स इतका होता. 


मधमाश्यांचा दुसरा हल्ला २६.३  ओव्हर नंतर झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला होता. श्रीलंका याअ सामन्यामध्ये केवळ १६३ धावा बनवण्यात यशस्वी ठरली होती.